• Mon. May 5th, 2025 9:43:35 PM

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत प्रीतम मुंडे काही कारणास्तव मुंबईत असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांची सांत्वन्पर संवाद साधला. मात्र, यादरम्यान प्रीतम मुंडे अचानक या फोन कॉल चालू असताना भडकल्याचे ऐकायला मिळाले.

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाले आहे आणि त्यात खा. प्रीतम मुंडे मुंबईतील एका दवाखान्यात होत्या मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत असलेले अनेक फोन खा. प्रीतम मुंडे यांच्या पर्यंत पोहोचले. मात्र अर्जंट त्या ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नुकसान स्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सांगितला. यावेळेस त्यांनी देखील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी मोबाईलवरुन संवाद साधला. परंतु या दरम्यान घडलेल्या वेगळेपणाची घटना सगळ्यांनाच अचंबित करणारी होती. खा. प्रीतम मुंडे वैद्यकीय कारणास्तव एका रुग्णालयात होत्या नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम असल्याने कॉलमध्ये अडथळा येत होता .

अवकाळी पावसामुळे सर्वस्व गमावलेला शेतकरी म्हणाला, ‘आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या’

पंकजा मुंडेच पुन्हा बीडच्या पालकमंत्री व्हाव्या, प्रीतम मुंडेंची जाहीर मागणी

यासाठी प्रीतम मुंडे यांनी नेटवर्क मिळेल अशा एका ठिकाणी उभा राहून संवाद साधायचा प्रयत्न करत असतानाच ज्या ठिकाणी त्या उभा राहून संवाद साधत हा संवाद सुरळीत होत होता. त्याच ठिकाणी काही क्षणात त्या दवाखान्यातील सुरक्षारक्षक आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांना तिथे उभा राहण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. मात्र यावेळेस प्रीतम मुंडे भडकल्या अरे माझ्या जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना बोलण्यासाठी कसली परवानगी आणि कशाचा आलाय हा प्रोटोकॉल शेवटी प्रीतम ताई मुंडे भडकल्याने काही वेळ भ्रमणध्वनी ऐकत असलेल्या सगळ्यांना वेगळाच धक्का बसला. मात्र, प्रीतम मुंडे यांच्या त्या शब्दाने जिल्ह्यातील नागरिक, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मनातील कळवळा हा शब्दातून पाहिला दिसत होता आणि प्रीतम मुंडेचं एक वेगळेपण देखील या भ्रमणध्वनी कॉलनी जनतेसमोर पुन्हा एकदा उघड झाला आहे .यावेळेस बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या अरे माझ्या जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना तुमचं काय सुरू आहे या शब्दात त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला चांगलंच खडसावलं हा प्रीतम मुंडे यांचा व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आज नागरिकांना देखील अनुभवायला मिळाला मात्र या फोन कॉलची चर्चा सध्या जिल्हाभरात चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed