• Sat. Sep 21st, 2024
सुट्टीसाठी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील घटना

कोल्हापूर: बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार धनवाडी तालुका गडिंग्लज) असे जवानाचे नाव आहे. जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.

आठच दिवसांपूर्वी वडिलांना अखेरचा निरोप, सेवेवर परत जाताना रेल्वेतून पडून जवानाचा दुर्दैवी मृत्यू

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवानंद मल्लाप्पा आरबोळे हा दहावीनंतर सैन्य दलामध्ये भरती झाला होता. तो सध्या मेघालय येथे आपले कर्तव्य बजावत होता. दरम्यान त्याची राजस्थान येथे बदली झाल्याने तो काही काळ सुट्टीसाठी आपल्या गावी गडहिंग्लज तालुक्यातील धनवाडी येथे आला होता. तर शिवानंद याचा अद्याप विवाह झाला नसल्याने त्याच्यासाठी मुली पाहणे देखील सुरू होते. रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या आई-वडिलांसोबत तो शेतात कामासाठी गेला होता, तिथेच जेवण करून दुपारी तो आंघोळीसाठी घरी आला. दरम्यान घराच्या पाठीमागे असलेल्या जनावराच्या गोठ्यात जाऊन त्याने गोठ्याचा दरवाजा आतमधून बंद केला. त्यानंतर गोठ्याच्या वाश्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

उडी अखेरची ठरली! मरीन कमांडो विमानातून झेपावला; नियमित सरावावेळी जीव गमावला; जबाबदार कोण?

बराच वेळ तो बाहेर न आल्याने त्याच्या आजीने आरडाओरडा केली. यावेळी नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांनी एकत्र येत गोठ्याचा दरवाजा उघडला यावेळी शिवानंदने गळफास घेतल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. दरम्यान नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. शिवानंदने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून शिवानंद चे मोठे बंधू देखील सैन्य झाल्यात असून तेही सुट्टीसाठी आपल्या गावी आले होते. शिवानंद च्या पश्चात आई वडील भाऊ आणि भावजय असा परिवार असून शिवानंदने उचललेल्या या टोकाच पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.

मोरवणे गावचे सुपुत्र शहीद अजय ढगळे पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलीने दिला मुखाग्नी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed