१३८ वर्षांनंतर घरात मुलीचा जन्म झाला. घरात लक्ष्मी आल्याचं कळताच कुटुंबात एकच जल्लोष साजरा झाला. १७ मार्च रोजी कॅरोलिन आणि अँड्रू क्लार्क या जोडप्याला कन्यारत्न झालं. या चिमुरडीचं नावं ऑड्रे असं ठेवण्यात आलं आहे. १३८ वर्षानंतर घरात मुलगी जन्माला आल्यानने सगळीकडे आनंदीआनंद आहे. मिशिनगच्या या कुटुंबाचा आश्चर्याचा धक्काच बसला आहे.कॅरोलिन आणि एंड्र्यु या दाम्पत्याला आधीच चार वर्षांचा मुलगा आहे. सप्टेंबरमध्ये त्यांना ते पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याचं कळलं. काही महिन्यानंतर त्यांना मुलगी होणार असल्याचे कळताच आश्चर्याचा धक्का बसला आणि जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा कुटुंबातून सर्व व्यक्तीने आनंदाने जल्लोष केला. तर, थोरा-मोठ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
मुलीच्या जन्मानंतर कॅरोलिन म्हणते की, पती अँड्रूने तिला १० वर्षांपूर्वी सांगितलं होतं की त्यांच्या कुटुंबात १८८५ पासून मुलगीच जन्माला आली नाही. त्यावेळी ते डेट करत होते. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही. म्हणून तिने अँड्रुच्या पालकांना याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनीही तेच सांगितलं. कॅरोलिनचा २०२१साली गर्भपात झाला होता. म्हणून यावेळी ते होणाऱ्या बाळाची आणि आईचीही जास्त काळजी घेत होते.

कॅरोलिनने सांगितलं की, मुलगी किंवा मुलगा या दोघांपैकी काही झालं असते तरी चालले असते. आम्हाला फक्त निरोगी मुल हवे होते. मुलगी झाली त्यावेळी आम्हाला जास्त आनंद झाला होता.
५० खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया?; जितेंद्र आव्हाडांचा रॅपमधून शिवसेनेला सवाल