दौंड : राज्यातील सर्वात मोठ्या येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावरील मळद इथे अपघात झाला असून या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे संपूर्ण महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा इथे येडेश्वरी देवीचे दर्शन करून तुळजापूर येथील देवीचे देवदर्शन करून पुण्यातील काशेवाडी येथील भाविकांची बस पुण्याच्या दिशेने परत निघाली होती. ही खाजगी ट्रॅव्हल्स बस पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीत पलटली. आज पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली.
साईंच्या काकड आरतीला पोहोचणं सहज शक्य होणार, वंदे भारत ट्रेननंतर शिर्डीतील भाविकांना आणखी एक गिफ्ट
या अपघातामध्ये १५ जखमी प्रवाशांना दौंड येथील पिरामीड हॉस्पिटलमध्ये तर ५ प्रवाशांना भिगवण इथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, सहायक फौजदार शंकर वाघमारे, किरण शिंदे, आबा शितोळे, राजू भिसे व पाटस टोलनाक्याच्या पेट्रोलिंग पथकाचे कर्मचारी पोचले असून मदतकार्य करीत आहेत.घराच्या खोदकामात मिळाली प्राचीन पेटी, उचलायला लागली ६ माणसं; उघडताच सगळे पडले गार…
या बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली असून या घटनास्थळी दौंड व कुरकुंभचे पोलीस पोहोचले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले असून हे सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
विदेशी कागद, कलर प्रिंटर अन् ५०० च्या करकरीत नोटा; मास्टर माईंडने ३ महिने बक्कळ पैसा छापला अन्…