• Sat. Sep 21st, 2024
भरधाव ट्रॅक्टर पहाटे वस्तीत घुसला, एका मुलीचा मृत्यू, महिलेसह चिमुकली जखमी, घर उद्ध्वस्त

जळगाव : जिल्ह्यातील भडगाव आमडदे येथे आज पहाटे वाळूची चोरटी वाहतूक करणारा भरधाव ट्रॅक्टर नागरिकांच्या वस्तीत घुसला. या दुर्घटनेत एका ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. वैशाली बालू सोनवणे वय ११ असे बालिकेचे नाव आहे तर बानूबाई वाघ ( वय ४२) ही महिला आणि पिंकी सोनवणे ( वय ५) हे चिमुकली जखमी झाली आहे. ट्रॅक्टरच्या धडकेनं घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमडदे येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणारा भरधाव वेगानं जाणारा ट्रॅक्टर आमडदे येथील गणपती नगरातील वस्तीमध्ये घुसला. या जोरदार धडकेमुळे एक बालिका ठार झाली असून तीन-चार घरांचं मोठं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत वैशाली बालू सोनवणे या बालिकेचा मृत्यू झाला असून बानूबाई वाघ ही महिला आणि पिंकी सोनवणे ही चिमुकली जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोषी ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती, कारवाईने खळबळ, कलेक्टरवर नामुष्की

वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप आमडदेकरांनी केला आहे. या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवल्यामुळं ही भयंकर घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या नेमके निकष

घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली असून तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला होता.आमडदे गावात या घटनेनंतर मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमा झाले होते. चालकाला पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांना स्वस्त दराने मिळणार वाळू, काय आहे दर आणि कशी मिळेल? असे आहे नवे वाळू धोरण

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed