पुणे: सध्या गावाकडे यात्रांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी यात्रांची परंपरा सुरू आहे. नुकतीच जुन्नर तालुक्यातील आणे गावची यात्रा पार पडली. त्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आता आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात मोठा उत्सव भरवला जातो. येथे ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे याला प्रसाद म्हणून तब्बल ११ पोती गव्हाच्या साडे तीन लाखाहून अधिक पुऱ्या, पाच पिंप गुळवणी व १ हजार किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद तयार झाला आहे. अशी पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाची शेकडो वर्षांची परंपरा थोरांदळे ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या रस्त्यावर थोरांदळे गाव आहे. या गावात ग्रामदैवत हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. ग्रामस्थ दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा तब्बल ११ पोती गव्हाच्या साडे तीन लाखाहून अधिक पुऱ्या , पाच पिंप गुळवणी व एक हजार किलो कांद्याच्या चटणीचा महाप्रसाद ग्रामस्थांनी तयार केला करण्याचे काम सद्या सुरू आहे.
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; वीज कर्मचाऱ्यानेच शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले?या महाप्रसादासाठी यंदा गावातील प्रत्येक घरातून एक माणूस एक आठवा व उंबऱ्यामागे चार आठवे गहू गोळा केला गेला. तो ११ पोती गहू एकत्र करून पुन्हा घरोघरी वाटला जातो. आज सकाळपासूनच हनुमान जनमोत्सवाचा प्रसाद बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावातील वाडी – वस्त्यावरील महिलांनी गावात येऊन हनुमान मंदिरासमोरील ओट्यावर येऊन पुऱ्या लाटण्याचे काम सुरु आहे.
पुण्यातील या गावात केला जातो महाप्रसाद
महिलांनी लाटल्या साडेतीन लाखांहून अधिक पुऱ्या
या महिलांनी तब्बल साडे तीन लाखाहून अधिक पुऱ्या लाटण्याचे काम सुरू आहे. गावातील तरुणांनी या पुऱ्या तळण्याचे काम करत आहेत. तर जेष्ठ नागरिकांनी चटणीच्या कांदा चिरण्याचे काम केले. आज बुधवारी रात्री उशिरापर्यंत हा ‘ पुर्या गुळवणीचा ‘ महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरु राहणार आहे.
Breaking अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, जामीन मिळणार की तुरुंगात जाणार?
उद्या गुरुवारी (दिनांक ६ एप्रिल ) रोजी पहाटे पाच ते सात ह .भ. प . नंदूमहाराज सोनवणे (रांजणी ) यांचे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर मांडव डहाळे व शेरणी मिरवणूक होऊन उपस्थित भाविक भक्त , पाहुण्यांना पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे . या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या उत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
तुुझे पैसे देत नाही जा; धमकी, शिवीगाळ करत आडत व्यापाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडवले