• Sat. Sep 21st, 2024
पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांचा नेमका चमत्कार काय? पुण्यातल्या शिक्षकाने सांगितलं खरं रॉकेट सायन्स

पुणे : हिंगोलीचा पाण्यावर तरंगणारा बाबा अनेकांनी पहिला असेलच. त्यांनी केलेला दावाही तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. मात्र, त्यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसून किंवा यात कोणतेही रॉकेट सायन्स नसून हे योग साधनेमुळे सहज शक्य असल्याचं मत योग शिक्षक डॉ. बापूसाहेब सोनवणे यांनी केलं आहे. या तरंगणाऱ्या बाबाने केलेला दावा यामुळे फोल ठरवला आहे.पुणे जिल्ह्यातील चाकण येथील योग शिक्षक बापूसाहेब सोनवणे याबाबत अनेक दिवसांपासून काम करत आहेत. अनेकांना पाण्यापासून जीवाला भीती वाटत असते यातून अपघात होतात. मात्र, या अवलियाने या भीतीवरच विजय मिळवला आहे.

ग्रंथांचं वाचन करून विद्या प्राप्त; पद्मासन घालून कित्येक तास पाण्यावर तरंगणारे हरिभाऊ महाराज

विदेशी कागद, कलर प्रिंटर अन् ५०० च्या करकरीत नोटा; मास्टर माईंडने ३ महिने बक्कळ पैसा छापला अन्…
यावेळी सोनवणे यांनी सांगितले की, पाणी हा पंच महाभूतांमधील महत्वाचा घटक आहे. याच पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहता येत नाही, तेव्हा त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. तसेच पाण्यात हातपाय हलवणारे आपण अनेकजण पाहतो. तसेच योग साधनेतून हातपाय न हालवता आपण पाण्यावर कितीही वेळ राहू शकतो हे सोनवणे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवून दिले आहे. त्यामुळे बिना हातपाय हलवता पाण्यावर तरंगून राहणे शक्य असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे.

जलयोग आणि हवेतील योगाने संपूर्ण शरीराला ताण मिळत असल्याचे ते सांगतात. बापूसाहेब सोनवणे अनेक ठिकाणी मोफत योग शिबिरे आयोजित करत असतात. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि अमलदारांना ते मोफत योग शिकवतात. त्यामुळे हिंगोली येथील बाबा करत असल्या दाव्यात तथ्य नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे.

गर्लफ्रेंडला कॅनडाहून बोलावलं, भेटताच घातल्या गोळ्या; मृतदेहासोबत असं केलं की तपासात पोलीस हादरले…
पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगासनांनी फायदे होतात तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील. तसेच दमछाक होऊन जे मृत्यू होतात ते कमी होतील. पाण्याविषयी लोकजागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे हाच आपला उद्देश असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे.

हिंगोलीतल्या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश, थेट डेमो दाखवून उघडं पाडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed