• Sat. Sep 21st, 2024
म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता या तारखेपर्यंत करु शकता अर्ज

Mhada Lottery 2023 Mumbai: म्हाडाच्या घराचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

mhada
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा कोकण मंडळातील ४,६४० सदनिका आणि १४ भूखंडांच्या सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज सादर करताना अर्जदाराला पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याची आता आवश्यकता नसेल, असे म्हाडाने जाहीर केले आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत आतापर्यंत २२,३८० जणांनी अर्ज सादर केले आहेत. म्हाडाने अर्ज सादर करण्याच्या प्रणालीत बदल केल्याने आणि अर्ज भरतानाच विविध कागदपत्रे सादर करण्याचे बंधन घातले आहे. त्यातून अनेकांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. त्यातून अर्ज करणाऱ्यांची संख्या काहीशी कमी आहे. त्यामुळे म्हाडाने ही प्रक्रिया आता काहीशी सुलभ केली आहे.

सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते. ही माहिती आता एका चौकटीत दर्शविली जाणार आहे. यातील माहितीत काही त्रुटी असल्यास त्यात सुधारणा करण्याची सुविधाही आता प्रणालीत देण्यात आली आहे. तसेच नाव बदलेले असल्यास ते प्रणालीत नोंदविण्याचीही सुविधा देण्यात आली आहेत, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली. त्याचबरोबर नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्जदाराकडे अर्ज करताना पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. मात्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी हे प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे, असेही मोरे यांनी सांगितले. कोकण मंडळाच्या या लॉटरीची संगणकीय सोडत १० मे रोजी काढली जाणार आहे. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ही सोडत काढली जाणार आहे.

मिंधे गटाच्या राज्यात विरोधकांना धमक्या देण्याचं सत्र; राऊतांना आलेल्या धमकीनंतर चंद्रकांत खैरेंनी सुनावलं

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed