• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांनो सांभाळा! एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची तीव्र लाट, पुढचा आठवडा ठरणार महत्त्वाचा

मुंबईकरांनो सांभाळा! एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची तीव्र लाट, पुढचा आठवडा ठरणार महत्त्वाचा

मुंबईः एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. याकाळात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यात मुंबईतील तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. १० एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका मुंबईच्या हवामानावर झाला होता. गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या थंड हवेमुळं मुंबईतील वातावरणात कधी गारवा तर कधी उकाडा वाढायचा. देशातील पश्चिमी भागात पावसाची तीव्रतादेखील कमी झाली आहे. तेथील तापमानात वाढ झाल्यामुळं मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

पश्चिमी भागात चक्रीवादळासारखे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं गुजरात आणि राजस्थानमध्ये तापमानात घट झाली होती. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळं पश्चिमी भागातील उष्ण वारे वाहू लागले आहेत. परिणामी मुंबईतील तापमानात वाढ होऊ लागली आहे. २ एप्रिल रोजी मुंबईचे तापमान ३१ अंशापर्यंत पोहोचले होते.

तीन महिने तीव्र उन्हाचे! एप्रिलमध्ये देशात उष्णतेची लाट; हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा
या आठवड्यात दिलासा

विदर्भ आणि तेलंगणामध्ये ६ ते ८ एप्रिलमध्ये चक्रीवादळासारथी स्थिती निर्माण होऊ शकते. याचा परिणाम मुंबईवरही होऊ शकतो. त्यामुळं या आठवड्यात मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उकाड्यात प्रचंड वाढ होऊ शकते. यंदा मार्च महिन्यातच महाराष्ट्रातील काही भागात तापमानाचा पारा ३९ अंशापर्यंत पोहोचला होता. वातावरण सतत होणाऱ्या बदलांमुळं यावर्षी तापमानात वाढ होऊ शकते.

कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली
सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळं मौसमी आजारही बळावले आहेत. या काळात व्हायरसचा फैलाव जास्त वाढतो. अशातच सर्दी, खोकला, तापयासारख्या रुग्णांची संख्या वाढते. मुंबईत सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत अजून वाढ होण्याची भिती आहे. हवामान स्थिर झाल्यानंतरच या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

क्या बात हैं…! मुंबई दुसऱ्यांदा ठरली जागतिक वृक्षनगरी; २०२२च्या यादीमध्ये मुंबईचा डंका

मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ, ट्रॅव्हल्सवाल्यांचा संताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed