• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते येत्या ५ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रवेश करताना ते काही समर्थक देखील आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. या प्रवेशाने ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे.

    राम गावडे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दची सुरुवात १९९१ पासून केली. शिवसेनेत असताना त्यांनी अनेक विविध पदांवर काम केले आहे. तसेच सहा वर्ष त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली आहे. धानोरे येथे त्यांनी शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपली राजकीय सुरुवात केली.

    खुर्च्या भाड्याने आणाल, माणसंही आणाल, पण ती सभा संपेपर्यंत खुर्चीवर बसतायेत काय? : उद्धव ठाकरे

    शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत असताना राम गावडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने केली. त्यात राम गावडे यांचा मोठा सहभाग होता. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी राम गावडे यांनी काम केले असून त्यांना शिवसेनेकडून जिल्ह्याचे प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकासासाठी काहीच दिले नाही. सतत अवमानाची वागणूक तसेच वारंवार बैठका घेऊनही त्यावर काहीच अंमलाबजावणी झाली नाही. त्यामुळे खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ या दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांना घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राम गावडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यातून तरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे गावडे म्हणालेत.

    काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, मिंधेंसह नितीशकुमारांचं तुम्ही काय चाटलं? ठाकरेंचा थेट शाहांना सवाल

    आम्ही घटना बचाव म्हणणार नाही, आम्ही घटना वाचवणार; वज्रमूठ घट्ट करत उद्धव ठाकरे गरजले

    शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार सुरेश गोऱ्हे यांच्या कुटुंबीयांनी शिंदे गटात प्रवेश केला. तरीदेखील ठाकरे शिवसनेने कुठलेही प्रयत्न केले नाहीत. अनेक निष्ठावंतांना यामुळे फटका बसत असून यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे राम गावडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

    माणसं भाड्याने आणाल पण ती सभा संपेपर्यंत खुर्च्यांवर कशी बसवाल? उद्धव ठाकरे

    तुम्ही माझा पक्ष चोरलात. तुम्ही तुमच्या सभेसाठी खुर्च्या आणि माणसं भाड्याने आणाल. पण ती माणसं भाषण संपेपर्यंत खुर्च्यांवर बसणार नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. ते रविवारी औरंगाबाद येथील वज्रमूठ सभेत बोलत होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed