‘देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की, देवाघरी पाठवण्याची दिली जातेय हमी? हाच का तुमचा धाक? #देवाभाऊसुपरफास्ट’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये युती सरकार आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी दर कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
फडणवीसांच्या त्या पोस्टरमध्ये राज्यात गुन्ह्यांचा तपास अधिक जलद होऊन गुन्हेगारी सिद्धता दरात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. २०१०मध्ये ८ टक्के वरून २०२३ मध्ये ४८ टक्क्यांपर्यंत गुन्हेगारी सिद्धता दर वाढला असल्याचं मांडण्यात आलं आहे. या सोबतच रोहित पवारांनी राष्ट्रवादी सरपंचाच्या निर्घृण हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही जोडलं आहे. त्यात काही व्यक्ती दुचाकीवर येऊन संबंधित व्यक्तीवर वार करताना दिसत आहे. या ट्विटमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
ना राडा, ना गोंधळ; गौतमीचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडला; गावाचं परफेक्ट नियोजन
प्रवीण गोपाळे यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवून चांगल्या मतांनी जिंकली होती. तसेच त्यांचा जामीन खरेदी विक्रीचाही व्यवसाय होता. त्यामुळे त्यांची हत्या नेमकी कुठल्या कारणामुळे झाली? हे अद्याप समोर आलेले नाही. पण एका राजकीय व्यक्तीची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
प्रवीण गोपाळे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढावं यासाठी पोलीस ठाण्यासमोर समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे मावळ तालुक्यात या हत्येने वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.