• Sat. Sep 21st, 2024
नागपुरात खळबळ! संत ताजुद्दीनबाबांचे वंशज सय्यद तालिबबाबा यांना अतिरेक्यांकडून धमकीचे ईमेल

नागपूर: सर्वधर्म समभावचे प्रतीक आणि देश-विदेशातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले नागपूरचे सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचे वंशज सय्यद तालिब ताजी बाबा यांना धमकीचे ईमेल आले आहेत. हाफिज सईदची संघटना जमात-उल-दावा आणि अबू मन्सूर असीनची दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबान यांच्या नावाने हे धमकीचे ईमेल आले आहेत.या ईमेलमध्ये सय्यद तालिब यांना लवकरच मारले जाईल, असे स्पष्टपणे लिहिले आहे. सय्यद तालिब हे हिंदू राष्ट्राचे समर्थन करतात असे या संघटनांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस विभाग सध्या या प्रकरणावर काहीही बोलण्यास तयार नाही.

मोदींचा जगात डंका; बायडेन, सुनकना मागे सारत बनले सर्वात लोकप्रिय नेते, पाहा कोण कुठल्या स्थानी
देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरातील एका सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या संताच्या वारसाला जीवे मारण्याच्या धमक्या परदेशी दहशतवादी संघटना देत आहेत. सुफी संताचा हा वारस सर्व धर्मांचा आदर करतो केवळ या कारणावरून ही धमकी देण्यात आल्याने ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे बाबा ताजुद्दीन यांना मानणारे लोक बोलत आहेत.

कोल्हापुरात राजकारण तापले; विरोधकांवर गंभीर आरोप करत अमल महाडिकांचे सतेज पाटलांना प्रत्युत्तर
मला सुरक्षा देण्यात यावी- सय्यद तालिब ताजी बाबा

दरम्यान, अतिरेकी संघटनांकडून अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर सज्जाद नशीन सय्यद तालिब बाबा यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. अशा प्रकारे आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या पाहता मला सुरक्षा प्रदान करण्यात यावी. माझे तसेच माझ्या कुटुंबाचे रक्षण होणे आवश्यक आहे. आमची सुफी संतांची परंपरा आहे. मी संत ताजुद्दीन बाबांचा वंशज आहे. मी सर्व धर्मांना मानणारा व्यक्ती आहे. मी सर्व धर्मांच्या धर्मस्थळांमध्ये जातो. हे अतिरेक्यांना टोचते, असे सय्यद तालिब ताजी बाबा यांनी सांगितले.

चिंता वाढवणारी बातमी! तुमच्या कर्जाचा वाढणार EMI, व्याजदरात वाढीची शक्यता, या आठवड्यात होणार मोठा निर्णय
सुफी संत बाबा ताजुद्दीन बाबा यांचे नागपूरमधील हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. केवळ देशातूनच नाही, तर जगभरातून लोक इथे प्रार्थना करण्यासाठी येत असतात. हे ठिकाण हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. या दर्ग्यात मुस्लिम आणि हिंदू संस्कृतीही जपली जाते हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed