बाइकवरील जीवघेण्या स्टंटचा हा १३ सेकंदाचा व्हिडिओ १.४ लाख लोकांनी सोशल मीडियावर बघितला आहे. या व्हिडिओबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई पोलिसांना ट्विट केलं होतं. मुंबई पोलिसांनी त्या ट्विटला रिप्लाय दिला होता. बाइकवरील स्टंटबाजांची ज्या कुणाला माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच या व्हिडिओ प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकाने स्टंटबाजाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक नंदराम लांगी यांनी स्वतःहून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी ही माहिती दिली. तसंच स्टंटबाजांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नेमण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली.
सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे, मग एकनाथ शिंदे दाढी कापणार का? | संजय राऊत