उद्धव ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सोबत गेल्यामुळं हिंदुत्व सोडलं म्हणता, मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्ती सोबत काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं?, असा सवाल ठाकरे यांनी केला. तुम्ही म्हणाल तो देशप्रेमी, तुम्ही म्हणाल तो देशद्रोही अशी तुमची भूमिका असेल तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केला.
आज अनेक युवकांनी पदवी मिळवली आहे, त्यांना पदवी मिळालेली नाही. अनेक पदवीधर असे आहेत त्यांना पदव्या दाखवून ही नोकरी मिळत नाही. पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हणलं तर २५ हजार रुपयांचा दंड होतोय. ते कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आपल्या कॉलेजचा विद्यार्थी पंतप्रधान झाला म्हणून त्या कॉलेजला अभिमान का वाटत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधानांची पदवी मागितली म्हणून २५ हजार रुपयांचा दंड मागितला जातो, ही नेमकी काय पद्धत सुरु आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरेंनी उपस्थितांना महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला पसंत होतं का? असा सवाल केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेता आणि पाठीत खंजीर खुपसता, असा सवाल केला. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आता विरोधात असताना पहिल्यापेक्षा घट्ट एकत्र आलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांची भाषा मला येत नाही असं नाही पण मला आवरावं लागतं. सत्तेसाठी राष्ट्रवादीचे तळवे चाटतो असं म्हणता तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचे तळवे चाटताय की काय चाटताय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना केला. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. ते सरकार पाडून तुम्ही नितीश कुमार यांचं काय चाटत होता, असा सवाल ठाकरेंनी अमित शाहांना केला.
तुमचा सोम्या गोम्या आमच्यावर वारेमाप आरोप करतो. देशातील सर्व विरोधी पक्षांना यंत्रणांकडून छळलं जातंय. अमित शाहांनी संगमांवर देशातील सर्वात भ्रष्ट आरोप केला होता. आता तुम्ही संगमाचं काय चाटता आहात, असं उद्धव ठाकरेंनी केला. दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात, दिसला भ्रष्ट की घे पक्षात, भाजप हे नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं नाव ठेवा असा टोला उद्धव ठाकरेंनी केला.