पोथोलवॉरीअर्स या संस्थेने व्टिटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ३० मार्च रोजी एक व्हिडिओ प्रसारीत केला होता त्यामध्ये बीकेसी परिसरात बांद्रा कुर्ला येथे एक बाईकस्वार दोन युवतींना मोटारसायकलवर बसवुन रस्त्याच्या कडेला वाहतुकीचे नियमांचे पालन न करता विनाहेल्मेट एका चाकावर स्टंटबाजी करून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत होता. सदर व्टिटच्या अनुषंगाने बीकेसी वाहतूक शाखेच्या अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरक्र १४० / २०२३ कलम ३०८,२७९,३३६,३४, ११४ भादविसह १८४, १९४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल करण्यात आल्यावर स्टंटबाजी करणाऱ्या आरोपीची माहिती पोलिसांनी मिळवली. स्टंटबाज मोटारसायकल स्वार हा अॅन्टॉप हिल व वडाळा टि.टी. पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचं समोर आलं. त्या अनुषंगाने आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथकास सूचना देण्यात आल्या होत्या. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा राहण्याचा ठावठिकाणा वारंवार बदलत होता.
पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे माहिती मिळवली असता आरोपी हा साकीनाका परिसरात असल्याचे समजले. त्यावरून साकीनाका परिसरात पोलीस पथकाने सापळा लावत आरोपीला मोटारसायकल सह ताब्यात घेत अटक केली आहे. फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी वय २४ वर्षे, असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर अॅन्टॉप हिल, पोलीस ठाणे आणि वडाळा टी. टी. पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी दिली.
ही कामगिरी विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई,देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, सत्य नारायण, पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), मुंबई, परमजितसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बांद्रा, (प) मुंबई, दिक्षीतकुमार गेडाम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-८ मुंबई, कैलास आव्हाड, सपोआ खेरवाडी विभाग, विश्राम अभ्यंकर, वपोनि बीकेसी पो. ठाणे, राजेश गवळी पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र जगदाळे, पोउनि विशाल पालांडे, सपोनि आनंद पवार, पोउनि सुशांत पाटील तसेच पथकाने केली आहे.
शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा