• Sat. Sep 21st, 2024

बागेश्वर बाबांच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याचं भाजपशी कनेक्शन? रोहित पवारांचं थेट चॅलेंज

बागेश्वर बाबांच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याचं भाजपशी कनेक्शन? रोहित पवारांचं थेट चॅलेंज

अहमदनगर: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि भाजपवरही टीका केली आहे. ‘हिमत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याते धाडस त्यांनी दाखवावे’, असे आव्हानच रोहित पवार यांनी भाजपला नाव न घेता दिलं आहे.

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या देवत्वाविषयी शंका उपस्थित केली. तसेच महात्मा गांधींवरही टीका केली आहे. या संबंधी आमदार पवार यांनी म्हटले आहे, साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध. पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागला आहे.

शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, विखे-पाटलांकडून बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बोंधू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावं. निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलं आहे. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

भिवंडीत बागेश्वर धामच्या मंदिर व आश्रमाचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या हस्ते भूमिपूजन

गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता; बागेश्वर बाबांचं शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य

राधाकृष्ण विखे-पाटलांनी बागेश्वर बाबाला सुनावले खडे बोल

बागेश्वर बाबा सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी साईबाबांविषयी बोलत असल्याची टीका भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. बागेश्वर बाबा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान स्वीकारू शकले नाहीत. बाबा लोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे. हेच बाबा धार्मिक तेढ निर्माण करताहेत, सामाजिक अशांतता निर्माण करत असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed