• Mon. Nov 25th, 2024

    चहा प्यायची इच्छा झाली, घाटात टँकर लावून चालक खाली उतरला अन् मग कोल्हापुरात घडला एकच थरार

    चहा प्यायची इच्छा झाली, घाटात टँकर लावून चालक खाली उतरला अन् मग कोल्हापुरात घडला एकच थरार

    कोल्हापूर: भारतात चहाचे शौकीन असलेले लोक अनेक पाहायला मिळतात. कोल्हापुरात तर चहाच्या या सवयीमुळं मोठा अपघात होता होता वाचला. पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटात चढावर उभा असलेला पाण्याचा टँकर दरीत घसरल्याची घटना समोर आली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी घडली नाही तर हा टँकर एका झाडाला अडकल्याने मोठे नुकसान टळले आहे. या टँकरच्या अपघाताचे कारण ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, कोल्हापुरातील बुधवार पेठमधील एका निवासी शाळेला टँकरच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. रोजच्या प्रमाणे आज ही चालक टँकर भरून पाणी घेऊन वाघबीळकडे येत होता. दरम्यान त्याला चहाची टपरी दिसली आणि चहा पिण्याची इच्छा झाली यामुळे चालक रस्त्यावर असलेल्या चढणावर टँकर उभा करून चहा पिण्यासाठी उतरला.

    शेवटी लेकीचं काळीज ते! पोलीस बाबा दंगलीतून सुखरुप घरी परतले, मुलीने हंबरडा फोडत मारली मिठी
    टँकरमध्ये काटोकाट पाणी भरले असल्याने टँकरचे वजन जास्त होते. दरम्यान टँकरचालक चहा पिण्यासाठी टपरी वर गेले असता याच वेळी अचानक टँकर हळूहळू मागे सरकण्यास सुरवात झाली. टँकर मागे येत असल्याचे लोकांच्या लक्षात येताच तेथील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान लोकांनी मागे पळत जात टँकर येत असलेल्या दिशेच्या रस्त्यावरील वाहने दुचाकी चारचाकी बाजूला केल्या मात्र हा टँकर पाणी भरलेला असल्याने रस्त्याच्या उतारावर वेग वाढला आणि वाघबीळ थांब्याच्या दरीत कोसळला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकर मागे जात दरीत एका झाडाला धडकून अडकला. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असल्याचे बोलले जाते.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यामध्ये एकाचा मृत्यू; गोळी लागल्याने सुरु होते उपचार

    मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ, ट्रॅव्हल्सवाल्यांचा संताप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *