• Mon. Nov 11th, 2024
    २४ लाखांच्या डम्परचा वाद; डोंबिवलीच्या व्यावसायिकास शिर्डीतील भावांची जीवे मारण्याची धमकी

    डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या दावडी गावात राहणारा व्यावसायिक आणि त्याच्या मुलाला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील दोन भावांनी गुरुवारी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. डम्पर खरेदीतील व्यवहारावरुन ही धमकी देण्यात आली आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.महादूसिंग महेर (वय ४७ वर्ष, समर्थ कॉम्प्लेक्स, दावडी, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव आहे. प्रदीप सुनील सरोदे, नीलेश सुनील सरोदे (रा. शिर्डी, नगर) अशी धमकी देणाऱ्या भावांची नावे आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात महेर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेर यांचा डम्पर होता. डम्परसाठी काम नसल्याने त्यांनी तो २४ लाख रुपयांना शिर्डी येथील सरोदे बंधूंना गेल्या वर्षी विकला होता. या व्यवहारात महेर यांचे डम्परवरील बँकेचे थकित कर्जाचे उर्वरित हप्ते भरण्याची तयारी सरोदे बंधूंनी दर्शवली होती.

    महेर यांचा डम्पर सरोदे बंधू घेऊन गेले होते. बँकेचे चार हप्ते भरल्यानंतर सरोदे यांनी डम्परवरील उर्वरित हप्ते वेळेत भरण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेतून महेर यांना थकित रकमेबाबत विचारणा होऊ लागली. महेर सरोदे यांना हप्ते भरण्यास सांगू लागले. ते त्यास दाद देत नव्हते. बँकेकडून सतत होणाऱ्या विचारणेमुळे महेर यांनी सरोदे यांना हप्ते भरणार नसला तर मी डम्पर परत ताब्यात घेतो असे सांगितले.

    पत्नी-मुलांना सासुरवाडीला सोडलं, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, नाशकात हळहळ
    गुरुवारी सकाळी महेर, मुलगा विकास, त्यांचा चालक मयूरेश गट्टे शिर्डी येथे सरोदे बंधूंच्या घरी गेले. त्यांनी स्वतःजवळ असलेल्या चावीचा वापर करुन सरोदे बंधूंच्या ताब्यातील डम्पर डोंबिवलीत आपल्या घरी आणला.

    सलमान खानला पुन्हा धमकी, गॅलेक्सीबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली

    हा विषय सरोदे बंधूंना समजताच त्यांनी गुरुवारी संध्याकाळी महेर यांना संपर्क करुन तुम्हाला पैसे देतो सांगितले होते. तरी तुम्ही डम्पर घेऊन का गेले? अशी विचारणा केली. तुम्ही जर डम्परचा ताबा दिला नाही तर तुमच्या मुलाला उचलून नेऊ किंवा डोंबिवलीत येऊन तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी दिली. डम्परचे पैसे दिल्याशिवाय मी डम्पर देणार नाही, अशी भूमिका महेर यांनी घेतली.

    सरोदे बंधूंकडून जीवाला धोका निर्माण झाल्याने महेर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सरोदे बंधूंच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

    आधी बायको गेली, आता नवऱ्यालाही मृत्यूने ओढलं, कोकणातील बाईक अपघातात तरुणाचा अंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed