• Mon. Nov 25th, 2024
    नियम मोडणारी कार थांबवण्याचा प्रयत्न, पुण्यात चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं

    पुणे : पुण्यातील खडकी येथे शुक्रवारी रात्री नियमभंग केल्याने एका वाहतूक कॉन्स्टेबलला कारच्या बोनेटवर सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेलं. खडकी पोलीस ठाण्यासमोरील चर्च चौकाजवळ ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    कारचा चालक सूरज जाधव (वय २९) असून त्याला अटक करण्यात आली आहे. गणेश शिवाजी रबडे असं वाहतूक कॉन्स्टेबलचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

    २०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

    हे कॉन्स्टेबल खडकी अंडरपासवर ड्युटीवर असताना त्यांना एक एक्सेंट कार लेन ओलांडून जाताना दिसली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला पण कार ड्रायव्हर थांबला नाही. त्याउलट त्याने गणेश रबडे यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला.

    स्वत:ला वाचवण्यासाठी रबडे यांनी कारच्या बोनेटवर उडी मारली आणि त्याला पकडता येईल अशा वस्तूला पकडलं. ते ओरडत राहिले तरीही चालकाने त्यांना ओढत नेलं. ही घटना ज्यांच्या लक्षात आली त्यांनी मध्यस्थी करत चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडलं. रबडे यांना कारमधून फेकण्यात आलं आणि त्यांच्या डाव्या घोट्याला आणि दोन्ही गुडघ्याला दुखापत झाली, असं पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी सांगितले.

    महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग, यात्रेच्या दिवशी राडा; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *