हे वास्तव समोर आल्यानंतर शिळ डायघर पोलिसांनी प्रसार माध्यमांसह अन्य कोणालाही त्या जागी प्रवेश करू दिला नाही. मात्र किती दिवसांपासून ही ऑइल चोरी या परिसरात सुरू होती? कोण या मागील सूत्रधार आहे. त्याचा शोध घेण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभं ठाकल आहे.
चोरीसाठी खड्डा देखील तयार
शिळफाटा चौक परिसरात क्रूड ऑइलची चोरी करण्यासाठी व्हॉल मुख्य वाहिनीला बसवण्यात आले आहे. त्यामधून दररोज क्रूड ऑइल चोरी सुरू असायची. मात्र या प्रकरणाची कल्पना प्रशासनाला कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. क्रूड ऑइल चोरीसाठी एक खड्डा देखील तयार करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्रूड ऑइल लहान ड्रममध्ये भरून बाजारात विक्री केले जात आहे. मात्र क्रूड ऑइल चोर कोण आहे. हे शोधण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर असणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश…
शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर स्थानिक आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली होती. यानंतर तातडीने मनसेकडून मदतीची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या घरांचे आणि दुकानांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र त्या नंतर मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
२१ तासांनी गूढ आलं समोर
शिळफाटा चौकात झालेल्या स्फोटानंतर आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला देखील कारण कळू शकत नव्हते. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास तब्बल २१ तासांच्या कालावधीनंतर स्फोट आणि आगीचं कारण हे समोर आलं आहे, त्यामुळे आता बीपीसीएल कंपनी आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
बड्डे शहेनशहाचा…जल्लोष साऱ्या गावाचा; डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा