त्यानंतर नातेवाईकांनी सुपडु ढोले यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांनाही घरी आणले. मात्र आपली पत्नी आपल्याला सोडुन गेल्याचे अतीव दुःख त्यांना झाले असल्याने सायंकाळी सुपडु ढोले यांनीही आपले प्राण सोडले. या घटनेमुळे गावात मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान कोपर्डा येथे दोघांवर काल शनिवारी दि.११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
गरज माणसाला काय करायला लावेल? कर्ज फेडण्यासाठी चक्क रस्त्याच्या बांधकामाचा जेसीबीच चोरला
