दहिसर मधील कार्यक्रम संपल्यानंतर तासाभरानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्यासंदर्भात तक्रार दाखल केली असल्याचं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. म्हात्रे यांनी तक्रारीमध्ये सोशल मीडिया यूजर्स आणि पेजची नावं दिली आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ एडीट आणि मॉर्फ करुन प्रतिमा मलीन करण्याच्या आणि खासगी आयुष्यात अडचणी आणण्याच्या उद्देशानं व्हायरल करण्यात आल्याची तक्रार म्हात्रे यांनी दिली आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शीतल म्हात्रे संतापल्या
राजकारणामध्ये मला अनुभव आहे की पुरुषी जो विचार कसा असतो, एखादा पुरुष राजकारणातील स्त्री कसा वागवतो? माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. आज स्त्री ज्या पद्धतीनं काम करत असते ते खटकत असतं. एखाद्या स्त्री चांगल्या पद्धतीनं काम करु शकते त्यामुळं मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार सुरु होतात, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. काहीच सुचलं नाही की तिच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं तेच विरोधक करत आहेत. विरोधक खालच्या पातळीवर विचार करत आहेत. एखाद्या स्त्रीला अशापद्धतीनं बोलणं, व्हिडिओ टाकणं मनाला वेदना देणारं आहे. हे कुणी करतंय ते सर्वांना माहिती आहे.
मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही; धनंजय मुडेंचा पंकजा मुडेंवर हल्लाबोल
भावा बहिणीचं नात असलेल्या एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला अशा पद्धतीनं समाज विकृत नजरेने बघतोय याच्या मागं कुणाचं डोकं आहे हे आम्हाला माहिती आहे, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. पोलीस याचा तपास करतील आणि योग्य त्या व्यक्तीवर कारवाई होईल, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
माझं वडिलांकडून लैंगिक शोषण, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक गौप्यस्फोट