• Wed. Nov 13th, 2024

    भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Oct 31, 2022
    भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    मुंबई, दि. ३१ : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ देण्यात आली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली तसेच राज्यपाल कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले.

    पुढील २५ वर्षे  अमृतकाळ म्हणून देशासाठी महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. या कालावधीत आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर, हे ध्येय अधिक लवकर गाठता येईल. या दृष्टीने प्रत्येकाने भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशामधून केले. दक्षता जनजागृती सप्ताहामुळे भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढेल. यानिमित्त सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशातून केले.

    ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत- विकसित भारत’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे.

    0000

    Vigilance Awareness Week launched in Maharashtra Raj Bhavan

    Mumbai, 31st Oct : The ‘Integrity Pledge’ was given to the officers and staff of Raj Bhavan on the first day of the ‘Vigilance Awareness Week’ at Raj Bhavan, Mumbai today.

    Santosh Kumar, Principal Secretary to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari read out the ‘Integrity Pledge’ which was repeated by the staff and officers.  Messages of Governor Koshyari and State Chief Minister Eknath Shinde were read out on the occasion.

    Officers and staff took the pledge ‘to neither take nor offer bribe and to perform all tasks in a transparent manner’ on this occasion.

    The Government of Maharashtra has commemorated the ‘Vigilance Awareness Week’ from 31st  October to 6th November. The theme of the Vigilance Awareness Week is ‘Corruption free India for a Developed Nation’.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed