• Mon. Nov 25th, 2024

    कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

    ByMH LIVE NEWS

    Sep 30, 2022
    कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

    मुंबई, दि. 30 : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.

    मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

    मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासना विभागाचे सचिव परिमल सिंग, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

    मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच विविध विभागांच्या समन्वयाची आवश्यकता आहे. विशेष करून शालेय शिक्षण विभागाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शालेय जीवनातच मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली तर तंबाखूच्या व्यसनांपासून मुले दूर राहतील. शालेय शिक्षण विभागाने यासाठी कृती आराखडा आखून काम करावे.

    बैठकीच्या सुरुवातीला डॉ. व्यास यांनी कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, अवर सचिव तानाजी सरावणे उपस्थित होते..

    000

    रविंद्र राऊत/विसंअ/30.9.2022

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed