• Sat. Sep 21st, 2024

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत

ByMH LIVE NEWS

Sep 30, 2022
‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत

मुंबई, दि. 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑनएआयआर’ या ॲपवर सोमवार  दि. 3 ऑक्टोबर आणि मंगळवार दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या सनील शेट्टी यांनी प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीचा प्रवास  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मुलाखतीतून जाणून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed