राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. राज्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय.परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.काही भागात मुसळधार असला तरी सर्वदूर पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.हवामान शास्रज्ञ एस. डी. सानप यांनी परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली. परतीचा पाऊस सुरु झाला तरी राज्याला दिलासा देऊ शकेल अशी परिस्थिती नाही.या पावसामुळे महाराष्ट्राला फायदा होईल असे सध्या दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.