• Tue. Sep 22nd, 2026

Satara News: कोयना धरण परिसराला साडे चार तासांत भूकंपाचे पाच सौम्य धक्के; भूकंपांची तीव्रता किती?

सुधीर पाटील, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडे बारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. तीव्रता कमी असल्याने हे धक्के जाणवले नाहीत. दरम्यान, कोयनानगरचे भूकंप मापन केंद्र बंद असल्याने कोयना धरणापासून भूकंपांच्या केंद्रबिंदूचे अंतर, जमिनीतील खोली आणि अक्षांश, रेखांश याची नोंद होऊ शकली नाही.

कोयना धरणाचा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या परिसराला लहान-मोठे भूकंपाचे लाखो धक्के बसले आहेत. त्यातील बहुतांश धक्के जाणवलेले देखील नाहीत. 3 पेक्षा जास्त रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवतात. एका अर्थाने कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिकाच सुरू असते. मात्र, धरणाला आजपर्यंत कसलाही धोका निर्माण झालेला नाही.

कोयना धरण परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास पहिला सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.1 एवढी होती. त्यानंतर एका तासाने दीड वाजता 2.3 क्षमतेचा दुसरा धक्का बसला. त्यानंतर सव्वा तीनला 2.2, पंधरा मिनिटांनी 2.5 आणि पहाटे चार वाजता 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा पाचवा भूकंपाचा धक्का बसला.

मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत झालेले पाचही भूकंपाचे धक्के सौम्य होते. त्यामुळे नागरिकांना ते जाणवले नाहीत. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोयना धरण परिसरात अथवा पाटण तालुक्यात कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. ऐन गणेशोत्सवात भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसल्याचे समजताच नागरिक भयभीत झाले.

कोयनानगर, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही केंद्रांवर भूकंपाची नोंद होते, त्याचवेळी भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर, त्याची खोली आणि अक्षांश, रेखांशाची अचूक माहिती मिळते. सध्या कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्र बंद असल्याने सविस्तर नोंदी मिळू शकल्या नाहीत, अशी माहिती कोयनेच्या भूकंप मापन केंद्रातील अधिकारी किरण कानुगडे यांनी दिली.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed