• Wed. Sep 23rd, 2026

मुंबई शहर, उपनगरातील मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

मुंबई, दि. २२ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुलांचे शासकीय वसतिगृह मुंबई शहरासाठी वाशी, नवी मुंबई येथे, तर मुंबई उपनगरसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृह योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत निवासासोबत भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येतो. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातील बारावीनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा.

धोंडिराम अर्जुन/विसंअ

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed