ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या ‘गायमुख – कासारवडवली – वडाळा’ या ‘मेट्रो – ४’ व ‘मेट्रो – ४ अ’ मेट्रो मार्गिकेवर गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मेट्रो डब्यांची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. तब्बल वर्षभरानंतरही मेट्रो सुरू झालेली नाही. या ट्रायल रनचा प्रवास नियमित सुरू व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निर्देशाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि पालिकेचे गटनेते अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो मार्गिका-4 आणि 4-अ’ प्रकल्पाची एकूण लांबी 35.20 किमी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. मागील वर्षी या मेट्रो मार्गाची ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही अपेक्षीत प्रगती झालेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बाप्पा राज्यकर्त्यांना सुबुद्वी दे… ठाणेकरांना मेट्रोत बसू दे, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय, घोडबंदरकरांना ट्रॅफिकमुक्त प्रवास द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
ठाणे शहराची भविष्यातील लाईफलाईन असलेल्या मेट्रो मार्गिकेची मोठ्या गाजावाज्यात 22 सप्टेंबर 2025 रोजी ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही मेट्रो सुरू झालेली नाही. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी केलेला ट्रायल रनचा प्रवास नियमित सुरू व्हावा, यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि गटनेते अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनसमोर चक्क मेट्रो मार्गाला पुष्प अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून अनोखे आंदोलन केले.
Pandharpur News : 10 वर्षांचं प्रेम, तरीही वृद्ध महिलेने प्रियकराला का संपवलं? पंढरपूरच्या प्रकरणात मोठा खुलासा मंगळवारी चितळसर- मानपाडा पोलीस ठाण्यासमोरील मेट्रो मार्गाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच गटनेते अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत एकवटले. या कार्यकर्त्यांनी प्रस्तावित स्टेशनमध्ये जाऊन रेल्वे मार्गास तसेच स्टेशनच्या फलकास हार घातले; रेल्वे रूळांना नारळ फोडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली.
जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान काय म्हणाले?
याबाबत मनोज प्रधान म्हणाले , “एक वर्षापूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी २२ सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मोठ्या थाटात आले मेट्रोच्या रॅकमध्ये बसले. त्यांचे कार्यकर्ते त्या मेट्रोच्या रॅकमध्ये बसले आणि दोन स्टेशनची मेट्रो धावली; त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेस ते सांगत होते की, ही टेस्ट आहे. मग टेस्ट असताना का तुम्ही हारतुरे लावून एका उद्घाटनाच्या पद्धतीने हे उद्घाटन का केले? हा प्रश्न आमच्या मनात आहे.”
“तुम्ही फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम घेतला होता. आज पूर्ण एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज असे दिसतेय की, पुढच्या एक वर्षामध्ये पण ही मेट्रो चालू होणार नाही. आज त्यांचं म्हणणे आहे की दोन-तीन महिन्यानंतर कॅडबरीपर्यंत आपण हा मेट्रो लाईन चालू करू. पण लवकरात लवकर वडाळ्यापर्यंत ही मेट्रो धावली पाहिजे म्हणून मुद्दामून आम्ही आज हा अनोखे आंदोलन या ठिकाणी केले आहे”, असं मनोज प्रधान यांनी स्पष्ट केलं.
‘रिंग रेल्वे आधी ही मेट्रो चालू करा’
“जर तुम्हाला खरोखरच ठाणे स्टेशनचे ट्रॅफिक कमी करायचे असेल तर लोकांना घोडबंदरकरांना सुख सुविधा द्यायच्या असतील तर ही मेट्रो वडाळ्यापर्यंतच नाही तर ती सीएसटी पर्यंत चालवा. त्याच अनुषंगाने आपण सांगतो की एलिव्हेटेड मेट्रो जर आपण 10 वर्षामध्ये चालू करू शकत नाही. तर रिंग रेल्वेचे काय हालत होणार आहे तुम्ही समजू शकता. 12,200 कोटी रुपये घेऊन जी रिंग रेल्वे तुम्ही चालू करायला जाताय; आधी मेट्रो लाईन चार आणि पाच चालू करा आणि त्याच्यानंतर गरज पडली तर मग रिंग रेल्वेचं काम सुरू करा”, असं मनोज प्रधान म्हणाले.
Pune News : डीजे-डॉल्बीचा सर्रास दणदणाट, पोलीस ॲक्शन मोडवर, पुण्यात कठोर कारवाईदरम्यान , “कॅडबरी ते कासारवडवली या दरम्यान नववर्षात मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, मेट्रो तर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीतच; उलटपक्षी मेट्रोच्या कामातही दर्जा आणि नियोजन नसल्याचे दिसत आहे. ठेकेदार आणि सरकारचे साटंलोटं असल्याने मेट्रोचे काम रखडून ठाणेकरांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे, याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष मोठे आंदोलन उभारणार” असे प्रधान यांनी सांगितले.
Mumbai High Court : सर्वात मोठी बातमी! सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी, मुंबई हायकोर्टाचे निर्देशया आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी, राजेश कदम, विरू वाघमारे, कैलास हावळे, राजेश साटम, एकनाथ जाधव, धर्मेद्र अस्थाना, उमेश अग्रवाल, गजानन चौधरी, सचिन पंधरे, अक्षय भोसले, विश्वास चव्हाण, ज्ञानेश्वर राजपंके, आशिष खाडे, विष्णु माने, दिगंबर गरुड, दिपक पिंपळे, मल्लिका पिल्लई, हिनल जयवंत,विशांत गायकवाड, आशिष खाडे, आदी सहभागी झाले होते.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा