सौरभ बेंडाळे, नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत राज्यभरात ५३१ सापळे रचून नोंद झालेल्या गुन्ह्यांत ७५८ संशयितांनी साडेनऊ महिन्यांत तीन कोटी तीन लाख ५९ हजार २७२ रुपयांची लाच घेतली आहे. त्यापैकी राज्य पोलिसांच्या विविध विभागांत ८३ प्रकरणांत १३१ संशयितांनी ६९ लाख चार हजार २०० रुपयांची लाचखोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, वन विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नोंदीनुसार, सर्वाधिक सापळे नाशिक परिक्षेत्रात असून, ११० गुन्ह्यात १७७ संशयित, दुसऱ्या क्रमांकावर ठाण्यात १०२ गुन्ह्यांत १३१, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८३ गुन्ह्यांत १०९, पुण्यात ७५ गुन्ह्यांत ९२, अमरावतीत ५४ गुन्ह्यांत ७५, नांदेडमध्ये ५४ गुन्ह्यांत ४२, नागपूरमध्ये ४८ गुन्ह्यांत ६९ आणि मुंबई परिक्षेत्रात सर्वांत कमी २७ गुन्ह्यांत ४१ संशयित निष्पन्न झाले आहेत.
Nashik Politics : एकनाथ शिंदेंची शिवसेना तालुकाप्रमुखांना देणार 14 बुलेरो गाड्या, पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणनगरपालिका, क्रीडा विभाग, अन्न व औषधी द्रव्ये विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, धर्मादाय आयुक्त, म्हाडा, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेस्ट, सुधार प्रन्यास, कारागृह, बंदर, कौशल्य विकास व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ या विभागात २०२६मध्ये एकही लाचखोरीचा गुन्हा नोंद नाही. त्यामुळे ‘खाबूगिरी’ची रक्कम ‘शून्य’ असल्याची नोंद ‘एसीबी’ने केली आहे.
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई! 48.81 लाखांचा अन्नसाठा जप्त, फ्राईड ओनियन, खाद्यतेलाचा समावेशइतर विभागांतील लाचखोरी
राज्य परिवहन मंडळांत तीन गुन्ह्यांत चार लाख १०२ रुपये, ‘जलसंपदा’त तीन लाख ९० हजार ३०० रुपये, समाजकल्याण विभागात तीन लाख ५५ हजार ५०० रुपये, सहकार व पणन विभागात तीन लाख १४ हजार ५००, नगर परिषदेत तीन लाख चार हजार रुपये, राज्य उत्पादन शुल्कात अडीच लाख रुपये, पाणीपुरवठा विभागात दोन लाख ३० हजार रुपयांची लाचखोरी उघड झाली आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा