• Mon. Sep 21st, 2026

Kalachowki Maha Ganapati Mandap : ‘ गणपती बाप्पाच्या दर्शनाला एवढी गर्दी होते; पण सुरक्षेची व्यवस्था कुठे आहे? आम्ही गमावलेले मूल आता परत येणार आहे का’ असा आक्रोश चिमुरड्या रागिणीच्या आत्याने व्यक्त केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गणेशोत्सव मंडपातील तात्पुरत्या पाणी व शीतपेय विक्रीच्या स्टॉलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने मुंबईत आठ वर्षांच्या चिमुरडीचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रविवारी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास काळाचौकी परिसरातील महागणपती मंडपाजवळ ही घटना घडली. रागिणीचे कुटुंबीय रात्री २ वाजताच्या सुमारास दर्शनासाठी आले होते. मात्र, परिसरात मोठी गर्दी असल्याने त्यांनी रांगेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गर्दी कमी होण्याची वाट पाहत ते मंडपाबाहेरील दुकानांच्या बाजूला थांबले असताना अचानक विजेचा धक्का बसला.

या दुर्घटनेत रागिणीसह अन्य सहा जणांना विजेचा धक्का बसला. त्यांना तातडीने भायखळा येथील मसिना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रागिणीला मृत घोषित केले. अन्य जखमींवर उपचार सुरू असून, एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

गर्दीमुळे परत जाताना दुर्घटना

रागिणीच्या आत्या आणि घटनेच्या प्रत्यक्षदर्शी किस्मती यादव यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. ‘आम्ही रात्री २ वाजता दर्शनासाठी आलो होतो. गर्दी खूप असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. दुकानांच्या बाजूने जात असताना तिथे विजेचा प्रवाह उतरला. माझ्या दोन मुलांनाही विजेचा धक्का बसला. तिथे दिवे आणि वीजवाहिन्या होत्या. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे होते’ असे त्यांनी सांगितले. ‘एवढी गर्दी होते; पण सुरक्षेची व्यवस्था कुठे आहे? आम्ही गमावलेले मूल आता परत येणार नाही’ असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra TimesDarjeeling Barbecue Fire : हनिमून कपलसमोर बार्बेक्यूतील आग अचानक कशी भडकली? अखेर कारण समोर, नवविवाहितेची प्रकृती चिंताजनकघटनेवेळी मंडपाबाहेर मोठी गर्दी असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. विजेचा प्रवाह नेमका कशामुळे उतरला, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सहा जणांना धक्का, दोघांचा मृत्यू

दरम्यान, किरण नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९) आणि साहिल संदीप तारे (१९) यांच्यावर मसिना रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य दोघा जणांना परळ येथील ग्लेनीगल्स ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुजाता (३३) यांना मृत घोषित करण्यात आले, तर रुही सिंह (१२) या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Maharashtra TimesCrime News : शनिवारी परत येईन… युवराजचा जीव गेलेला, तरी दोन दिवस कुटुंबाला WhatsApp मेसेज येत राहिले; बहिणीला संशय अन् पर्दाफाशप्राथमिक पाहणीत गणेशोत्सवाच्या रोषणाईसाठी आणि शीतपेयाच्या स्टॉलसाठी तात्पुरते वीजमीटर बसवण्यात आल्याचे आढळले आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, शॉर्टसर्किट कशामुळे झाले आणि वीजप्रवाह स्टॉलमध्ये कसा उतरला, याबाबत काळाचौकी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात स्टॅालधारकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा