• Tue. Sep 22nd, 2026

Dr Manisha Jejurkar Death Case : डॉ मनीषा जेजुरकर यांनी बहीण रोहिणी थोरात यांना १४ डिसेंबर २०२५ रोजी ‘तुझे दाजी नीलेशचे वागणे खूप बिघडले असून ते नेहमी डॉ. स्वातीसोबत राहण्याच्या प्रयत्न करतात’, असे सांगितले होते

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : डॉ. मनीषा जेजूरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा पती जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजूरकर हा चार दिवसांपासून पोलिस कोठडीत असताना, सिव्हिलच्या मानसोपचार विभागाची प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण हिलादेखील अटक झाली. नीलेश व स्वातीच्या विवाहबाह्य संबंधांना त्रासून मनीषा यांनी आयुष्य संपवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, नीलेशची चार दिवसांची कोठडी आज (दि. २२) संपल्यानंतर, त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बहिणीच्या फिर्यादीत काय?

डॉ. मनीषा यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार, ‘डॉ. स्वाती चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख होती. तिने डॉ. नीलेशने तिच्यासोबत जवळीक साधून घरातील सर्व गोष्टी सांगत तिच्या मनाप्रमाणे वागत डॉ. मनीषाकडे दुर्लक्ष करून मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले.

तुझ्या दाजींचं वागणं बिघडलंय

दिवाळीत मनीषा आईवडिलांकडे आली असताना ‘तिला तिचा पती विनाकारण त्रास देत आहे’, असे सांगितले होते. मनीषाने रोहिणी थोरात यांना १४ डिसेंबर २०२५ रोजी ‘तुझे दाजी नीलेशचे वागणे खूप बिघडले असून ते नेहमी डॉ. स्वातीसोबत राहण्याच्या प्रयत्न करतात’, असे सांगितले.

Maharashtra TimesPune Accident : लग्न अवघ्या दोन महिन्यांवर, पुण्यात आयटी इंजिनिअरवर काळाचा घाला, दुचाकीच्या धडकेत प्राण गमावलेडॉ. जेजूरकर व डॉ. चव्हाण हे गंगापूररोड परिसरात वास्तव्यास असून त्यांचे सलग दोन वर्षे डॉ. नीलेशच्या घरी येणे-जाणे होते. लग्नाचा वाढदिवस असतानाही डॉ. नीलेशने घरी येण्यास उशीर केला होता. जानेवारी २०२६ मध्ये मनीषाने रोहिणीला फोनवर ‘आमच्या घरातील सर्व गोष्टी माझा पती डॉ. स्वातीला सांगतो. त्यामुळे आमच्या घरात काय चालले आहे, याबाबत सर्व त्यांना माहिती आहे. तसेच डॉ. स्वातीला फोन केल्यावर तिने ‘तू आता तुझ्या नवऱ्याला आवडत नाही, त्यामुळे हे सर्व घडत आहे’, असे सांगितले.

माझ्या मुलींचा सांभाळ कर

याच संवादादरम्यान मनीषाने बहीण रोहिणी थोरातकडे ‘मी खूप निराश असून पुढे जगण्याची इच्छा संपली आहे. माझे काही कमी-जास्त झाले, तर माझ्या मुलींचा सांभाळ कर’, या शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या, असे फिर्यादीत नमूद आहे.

Maharashtra TimesMethi Ban in School : डब्यात मेथी आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड, भाईंदरमधील खासगी शाळेला मनसेचा दणका, शिक्षण विभागाकडून ‘कारणे दाखवा’

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

– डॉ. नीलेश व पत्नी मनीषा दोघेही नैराश्यावर उपचार घेत होते
-डॉ. नीलेश व डॉ. स्वाती चव्हाण एकाच विभागात कार्यरत
– दोन्ही सिव्हिलमध्ये कार्यरत असल्याने मनीषा यांच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याचा संशय
– ९ एप्रिल २०२६ रोजी एका महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबानुसार नीलेशच्या विवाहबाह्य संबंधांची पुष्टी
– ५ मार्च रोजी लग्नात झालेला जाहीर अपमान आणि ६ मार्च रोजी झालेल्या आत्महत्येत अत्यंत कमी कालावधी असल्याने गुन्हेगारी हेतू किंवा चिथावणी प्राथमिकदृष्ट्या दिसून येते
– हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे नसून, हत्येचे असण्याचीही दाट शक्यता

गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी मनीषा यांनी आयुष्याची अखेर केली होती. त्यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून डॉ. नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या फिर्यादीमध्ये डॉ. स्वाती चव्हाण हिच्याही नावाचा उल्लेख असून, तिला सहसंशयित केल्याचे सरकारवाडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त तथा प्रकरणाचे तपास अधिकारी प्रमोद वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, घटनेनंतर १९३ दिवस न्यायालयीन बाबींनुसार नीलेशने बचावाचा प्रयत्न केला. मात्र नाशिक सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि अखेरीस १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाने हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे नसून, हत्येचे असण्याची शक्यता व्यक्त केली.

Maharashtra TimesBMW Car Crash : धैर्यचं लाईव्ह लोकेशन फ्रीझ का झालंय? आईने थरथरत्या हातांनी लेकाला फोन फिरवला, पोलिसांचं उत्तर ऐकताच अवसान गळालं

हत्येचा संशय

शवविच्छेदन अहवालात फेरफार आणि खिडकीच्या दोरीवरून ही हत्या असल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केला होता. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेने द्वारका चौकात त्याला अटक केली असून, आज, २२ सप्टेंबर रोजी त्याची पोलिस कोठडी संपणार आहे. तर स्वाती चव्हाण हिचा सहभाग उघड झाल्याने, तिला रविवारी चौकशीला बोलविल्यानंतर अटक करण्यात आली. सोमवारी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा