• Tue. Sep 15th, 2026

Crime News: भाडेकरू तरुणाकडून २२ वर्षीय घरमालकिणीवर बेडरुममध्ये घुसून अत्याचार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

​छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एकेकाळी घरात भाडेकरू म्हणून राहिलेल्या एका २४ वर्षांच्या तरुणाने जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत घरमालकिणीच्या बेडरूममध्ये बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर आरडाओरडा केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन २२ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

​सचिन राठोड असे आरोपीचे नाव

या प्रकरणी पीडित २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी सचिन अनिल राठोड (वय २२, रा. बंजारा कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन राठोड हा २ ते ३ वर्षांपूर्वी पीडितेच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. पीडितेच्या सासरी या संदर्भात माहिती झाल्यानंतर त्याला खोलीवरून काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी आरोपीने पीडितेला फोन करून भेटायला बोलावले. मात्र, मुलांची जबाबदारी असल्याने व वेळ नसल्याने पीडितेने भेटण्यास स्पष्ट नकार दिला. ​याच गोष्टीचा राग धरून त्याच रात्री ११ वाजेच्या सुमारास बेडरूमचा मागील दरवाजा वाजल्याचा आवाज आला. पीडितेने कडी उघडताच आरोपी सचिनने आत घुसून दरवाजा आतून लावून घेतला. “आरडाओरडा केलास तर तुझ्या नवऱ्याला आणि सासर्‍याला जीवे मारून टाकेन,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला आणि तेथून पसार झाला.

​एम. वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर कमालीच्या भीतीखाली असलेल्या विवाहितेने १२ सप्टेंबर रोजी एम. वाळूज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed