• Mon. Sep 14th, 2026

Baramati Crime News : पुण्यातील बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेचा घरात अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बारामती पणदरे घरात महिलेची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत विवाहितेच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्यारानं मारहाण करून, तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. वैशाली तानाजी पवार (वय 30, रा. पणदरे) असं हत्या झालेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय 50, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावच्या हद्दीत वैशाली पवार या त्यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत होत्या. काल शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून हल्ला केला. डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी काल शनिवारी रात्री साडेनऊपासून आज रविवारी पहाटे अडीचपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे तपास करीत आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली? तसेच आरोपी कोण आहे? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईत AC तिकिटाअभावी विद्यार्थिनीची फरपट, पालकांची गंभीर तक्रार; अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत मुंबईत काय घडलं?

होणाऱ्या लेकराचा चेहरा पाहिलाच नाही

पत्नीला प्रसूतीसाठी करंजविहीरे येथे सोडून गाडीतून मित्रांसह परतणाऱ्या दोघावर काळाने घाला घातला. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. मोरडेवाडीच्या हद्दीत गाडी वीस फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.

सुटल्याने गाडी 20 फूट खोल खड्ड्यात

आनंदराव शंकर कोळेकर (वय ५३, रा. करंजविहिरे) आणि किरण बाबूराव डुंबरे (वय 35 रा. दावडी) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी येथील किरण डुंबरे हे त्यांच्या पत्नीला करंजविहीरे येथे प्रसूतीसाठी सोडण्यास गेले होते. त्यांच्यासोबत मित्र आनंदराव कोळेकर होते. पत्नीला सोडल्यानंतर दोघे गाडीतून आळेफाटा येथे उपचार घेत असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी निघाले होते. कोळेकर गाडी चालवीत होते. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बाह्यवळण मार्गावर मोरडेवाडी गावच्या हद्दीत गाडी आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली.

Maharashtra TimesPune News : पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी वाहतुकीत महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे वाहतूक पोलिसांचं आवाहन; कसा असेल मार्ग?
या अपघातात कोळेकर व डुंबरे गंभीर जखमी झाले. विजय तांबडे, संतोष ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा