• Sat. Sep 12th, 2026

Pratap Sarnaik: एसटी चालकांची आता ड्रग्ज तपासणी; तपासणी यंत्रासाठी प्रताप सरनाईकांची लाख रुपयांची देणगी

मुंबई : एसटी चालकांच्या मद्यसेवनासोबतच अमली पदार्थांच्या सेवनाचीही तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. ‘नशामुक्त एसटी’ अभियानाच्या माध्यमातून चालकांची नियोजित तसेच अचानक तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष तपासणी यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या यंत्रांच्या खरेदीसाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. एसटी बसमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे चालक नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी व्यवस्था अधिक व्यापक करण्याचे नियोजन आहे.

अमली पदार्थांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी विशेष किटचा राज्यात प्रायोगिक वापर करण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातून संशयित पदार्थांची प्राथमिक पातळीवर तातडीने छाननी करता येणार आहे. प्राथमिक तपासणीत संशय आढळल्यास त्यानंतर विहित पद्धतीने नमुना तपासणी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

Mumbai Local Update: मुंबईकरांचा रविवारी खोळंबा; मध्य-हार्बर मार्गावर 13 सप्टेंबरला ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द, पाहा वेळापत्रकतपासणीचा विस्तार

सन २०२६ ते २०२९ या कालावधीत मद्य आणि अमली पदार्थ तपासणीची ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने व्यापक करण्याचे नियोजन आहे. महापालिका बससेवा, सरकारी वाहने, सार्वजनिक उपक्रम, खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांचाही त्यात समावेश केला जाणार आहे. औद्योगिक आस्थापनांची कर्मचारी वाहतूक, ट्रक, टँकर आणि धोकादायक मालवाहतूक यांनाही तपासणीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे.

Maharashtra TimesSawantwadi Express: बंद खिडक्या, फाटकी आसने; मुंबई- सावंतवाडी रेल्वेतील दुरवस्था, अस्वच्छतेने कोकणवासी त्रस्ततपासणीदरम्यान चालकाकडून सुरक्षित वाहन चालविण्यास धोका असल्याचे आढळल्यास त्याला तात्पुरते कर्तव्यापासून दूर करून पर्यायी चालकाची व्यवस्था करण्याची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. मात्र, केवळ कारवाईवर भर न देता व्यसनाधीन चालकांना समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तपासण्यांची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवण्याबरोबरच उपकरणांची कार्यक्षमता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संबंधित संस्थांकडून नियमांचे पालन यावरही देखरेख ठेवली जाणार आहे. गृह, आरोग्य, सामाजिक न्याय आणि शिक्षण विभागांच्या समन्वयातून याची अंमलबजावणी होणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed