• Sat. Sep 12th, 2026

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घनेनं मित्राच्या बहिणीला दिलेला लग्नाचा प्रस्ताव कुटुंबीयांनी नाकारल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

संभाजीनगर हर्सूल मेडिकलमध्ये तरुणाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत​, छत्रपती संभाजीनगर : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग मनात धरून गुन्हेगाराने दुकानात घुसून मुलीच्या 22 वर्षीय भावाच्या पोटात चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्सूल परिसरातील कोळठाणवाडी रस्त्यावर काल शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा रक्ताळलेला थरार घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 9 तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला सावंगी-फुलंब्री परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

शेख मोहम्मद फैजल अब्दुल कादर(वय 22, रा. उमर कॉलनी, हर्सूल) असं मृत मेडीकल चालकाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी मुख्य आरोपी रेहान अमीन पटेल (वय 25, रा. करीमनगर, हर्सूल) आणि त्याचा साथीदार समीर रईस शेख (वय 22, रा. हर्सूल) या दोघांना अटक केली आहे. मयत फैजलचा मोठा भाऊ शेख मुस्ताकीम याच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesNashik Crime : देशसेवेच्या स्वप्नाने सैन्यात भरती, २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने अकस्मात आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ

​लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा धरला होता राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुख्य आरोपी रेहान याच्या कुटुंबाने फैजलच्या धाकट्या बहिणीसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिचं लग्न आधीच दुसऱ्या ठिकाणी ठरलं असल्याने फैजलच्या कुटुंबाने हा प्रस्ताव नाकारला. या गोष्टीचा राग मनात धरून गुंड प्रवृत्तीचा असलेला रेहान फैजलच्या कुटुंबाला सतत त्रास देत होता. घरासमोरून व दुकानासमोरून मोठ्या आवाजात बुलेट पळवणे, आरडाओरड करणे आणि रस्त्यात खुन्नस देऊन धमकावणे असे प्रकार तो करत होता.

​कुराण पठण करत असताना हल्ला; पोलिसांची ९ तासांत धडक कारवाई

तीन दिवसांपूर्वीच रेहानने फैजलचे दुकान जाळल्याचा संशय होता. काल शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फैजल दुकानात शांतपणे कुराण पठण करत बसलेला असताना रेहान आणि समीरने आत घुसून त्याला बाहेर ओढलं. त्यानंतर रेहानने धारदार चाकू फैजलच्या पोटात खोलवर खुपसला. वार इतका भीषण होता की, चाकू पोटातच सोडून आरोपी पसार झाले. उपचारापूर्वीच फैजलचा मृत्यू झाला. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींचा माग काढत हर्सूल पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून सावंगी-फुलंब्री परिसरातून दोघांना अवघ्या 9 तासांत गजाआड केलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा