• Sat. Sep 12th, 2026

Mumbai Local Update: मुंबईकरांचा रविवारी खोळंबा; मध्य-हार्बर मार्गावर 13 सप्टेंबरला ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द, पाहा वेळापत्रक

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसह गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवामुळे रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे

स्थानक – ठाणे ते कल्याण

मार्ग – अप आणि डाउन धीमा

वेळ – सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३

परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

Disha Salian : आदित्य ठाकरेंच्या बेकायदा कामांची कुणकुण, दिशाने सुशांतला सगळं सांगितलं, म्हणून जीव गमावला, सतीश सालियन यांचा CBI ला जबाबट्रान्स हार्बर

स्थानक – ठाणे ते वाशी / नेरुळ

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम – ब्लॉक वेळेत ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल.

Maharashtra TimesMumbai Accident : शिवडीत ऑटो वर्कशॉपमध्ये कारने चिरडलं, 32 वर्षीय कामगाराचा करुण अंत, 17 वर्षीय मुलगा ताब्यातगणेशोत्सवापूर्वीच्या रविवारी मोठ्या संख्येने प्रवासीसाठी बाहेर पडतात. सामान्य दिवसाच्या तुलनते रविवारी शेकडो लोकल फेऱ्या कमी चालवण्यात येतात.अशात ही ब्लॉक घोषित करण्यात लोकल फेऱ्या सुमारे २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत. यामुळे उत्सवापूर्वीच्या रविवारी खरेदी करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एकेरी उल्लेख..शिवीगाळ करत अमोल खुणे नको ते बोलले! | Amol Khune On Manoj Jarange Patil

रिंग मेट्रोवरून राजकीय वाद

ठाणे : शहरातील प्रस्तावित अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असतानाच आता स्थानिक नागरिकांचाही विरोध तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेतच या प्रकल्पाच्या मार्गिकेवरून दोन गट पडल्याचे चित्र आहे. एकाच प्रभागात मेट्रोच्या मार्गावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, प्रस्तावित मार्गबदलाच्या विरोधात सावरकरनगर आणि परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून निदर्शने केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed