• Sat. Sep 12th, 2026

Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे चंदनगर मित्राची पैशांवरुन हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : शहरात किरकोळ वादातून गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच चंदननगर परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हातउसने घेतलेले अवघे 600 रुपये परत न केल्यानं आणि वादाच्या भरात आईवरून अपशब्द वापरल्यानं एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्रानं सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात राहुल राजेंद्र जंवाजाळ (वय 22, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचं गांभीर्य पाहता चंदननगर पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करत आरोपी आशिष डेव्हिड मगर (वय 27, रा. येरवडा) याला बेड्या ठोकल्या आहेत.

छुपा वाद आणि तणावाचं वातावरण

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत राहुल आणि आरोपी आशिष हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत होते, त्यांच्यात चांगली मैत्रीही होती. आरोपी आशिष हा एका नामांकित कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मित्रत्वाच्या नात्याने राहुलला 600 रुपये उसने दिले होते. घरगुती अडचणी आणि स्वतःच्या गरजांसाठी आशिषने हे उसने दिलेले पैसे राहुलकडे वारंवार मागितले. मात्र, राहुल आज देतो, उद्या देतो असं म्हणत टाळाटाळ करत होता. पैशांच्या या परतफेडीवरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये छुपा वाद आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Maharashtra TimesCrime News : तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला, संतापलेल्या तरुणाने मेडीकलमध्ये भावाला संपवलं; छ.संभाजीनगरमधील प्रकरणाचं कारण समोर

आईवरुन घाणेरडी शिवी

8 सप्टेंबर मंगळवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चंदननगर भागातील बोराटे वस्ती परिसरात दोघे अचानक समोरासमोर आले. तिथे पुन्हा एकदा 600 रुपयांचा विषय निघाला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हळूहळू या वादाचं रूपांतर जोरदार भांडणात झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात राहुलने आशिषला थेट आईवरून अत्यंत घाणेरडी व अश्लील शिवीगाळ केली. आईवरून दिलेली शिवी ऐकताच आशिषच्या रागाचा भडका उडाला. त्याने स्वतःवरील ताबा पूर्णपणे गमावला आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या खिशात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि काही समजण्याच्या आतच त्याने राहुलवर एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली.

राहुलचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू

गंभीर वार झाल्यानं राहुल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. परिसरातील नागरिकांमध्ये या प्रकारामुळे मोठी घबराट आणि पळापळ झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे राहुलचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला, तर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आशिष मगरला पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केलं. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे अधिक तपास करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा