• Thu. Sep 10th, 2026

सोलापुरातील ऐतिहासिक शिवलिंगाच्या जतनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी – वन मंत्री गणेश नाईक यांचे निर्देश – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : सोलापूर येथील मौजे मजरेवाडीमधील ऐतिहासिक शिवलिंगाविषयी गुरुदेव सेवा मंडळ आणि स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे. या ऐतिहासिक स्थळाचे जतन तसेच शिवलिंगाच्या उपासनेसाठी नियमानुसार मूळ जागा अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

गुरुदेव सेवा मंडळाची पूर्वापार वहिवाट असलेली जागा मंडळाच्या ताब्यात देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांच्यासह वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री श्री. नाईक म्हणाले की, ऐतिहासिक शिवलिंगाचे जतन आणि स्थानिक नागरिकांच्या उपासनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. सध्याची जागा उपलब्ध करून देणे शक्य नसल्यास पर्यायी जमीन देण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed