• Thu. Sep 10th, 2026

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात पहाटेपर्यंत धावणार मेट्रो, दर 5 मिनिटांनी फेऱ्या, कसे आहे नियोजन?

Ganeshotsav 2026 Pune Metro Schedule: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर सकाळी सहा ते २६ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ४१ तास मेट्रो सेवा अखंडित सुरू राहणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गर्दीच्या वेळेत पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत; तसेच, १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवात अप्रतिम रोषणाई, ऐतिहासिक आणि सामाजिक देखावे पाहण्यासाठी अथांग जनसागर रस्त्यावर उतरतो. ढोल-ताशांचा कडकडाट आणि बाप्पाच्या दर्शनाची ओढ यामुळे अलोट गर्दीतही भक्तिमय वातावरणाचा आणि उत्साहाचा अनोखा सोहळा रंगतो. या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या टप्प्यात १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची नियमित सेवा सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक लागू करण्यात येणार असून, या काळात सकाळी सहा ते मध्यरात्री दोनपर्यंत मेट्रो धावेल. २७ सप्टेंबरपासून पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार सकाळी सहा ते रात्री ११ अशी सेवा सुरू होईल.

Maharashtra TimesSomeshwar Sugar factory: पुन्हा पवार विरुद्ध पवार; ‘सोमेश्वर’साठी सुनेत्रा पवारांच्या पॅनेलसमोर युगेंद्र पवारांचे आव्हानमंडईत एकदिशात्मक व्यवस्था

गर्दीचे नियोजन करण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान एकदिशात्मक पद्धतीने कार्यरत राहणार आहे. लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील द्वार क्रमांक ३ मधून स्थानकात प्रवेश, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २ मधून बाहेर पडता येणार आहे. पेठ भागातील गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्यांनी पर्यायी स्थानकांचा वापर करावा. पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेवरून गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्यांनी कसबा पेठ स्थानकावर उतरावे. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरून डेक्कन जिमखाना, रामवाडीच्या दिशेने येणाऱ्यांनी पीएमसी स्थानकाचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले.

Maharashtra TimesPune News: पुण्यात धक्कादायक घटना; MBBS चं शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलंजिल्हा न्यायालयात इंटरचेंज टाळा

गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मार्गिका बदलणे (इंटरचेंज) टाळावे, असेही मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे. गर्दी कमी करण्यासाठी भाविकांनी आपल्या मार्गिकेवरील कसबा पेठ, पीएमसी, छत्रपती संभाजी उद्यान स्थानकांचा वापर करावा. गणेशोत्सव काळातील गर्दीचे नियोजन सुरळीत होण्यासाठी प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा