मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्याचबरोबर मागण्या पूर्ण करतोय; हाक द्या आम्ही ओ देऊ, असं देखील सामंत म्हणाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेले उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी, “जरांगे पाटलांच्या 13 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या असून त्यांनी उपोषण मागे घ्यावे, त्यांनी हाक दिल्यास आम्ही चर्चेला ओ देऊ,” असे स्पष्ट आवाहन केले.
“2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आरक्षण दिले. आरक्षण देणाऱ्या नेत्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग करणे योग्य नाही. कोणाबद्दलही वाईट वक्तव्य करू नये, अशी आमची विनंती आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी तपासण्यासाठी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत”, असं उदय सामंत म्हणाले.
हैदराबाद अन् सातारा गॅझेटवर कायदेशीर प्रक्रिया सुरू
शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सामंत यांनी स्पष्ट केले की, हैदराबाद गॅझेटची एसओपी तयार करण्यात आली आहे, तर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत अॅडव्होकेट जनरल यांचे कायदेशीर मत घेतले जात आहे. एसईबीसी प्रवर्गातून 3 लाख 50 हजार दाखले वितरीत करण्यात आले असून हे आरक्षण न्यायालयात टिकावे, हीच सरकारची भावना आहे. रद्द झालेल्या 4 प्रमाणपत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले असून ती न्यायालयीन बाब आहे.
Narendra Bhondekar : महायुतीत नाराजीच्या चर्चा, शिंदेंच्या आमदाराला काँग्रेसची ऑफर, नरेंद्र भोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया
‘हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा, आम्ही चर्चेसाठी तयार’, प्रसाद लाड यांचं आवाहन
आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले की, काल रात्री जरांगे पाटलांशी फोनवरून संवाद साधला असून खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत, अशी विनंती केली आहे. पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात समाजात सुसंवाद राहावा, हीच आमची भूमिका आहे. आज जिल्हाधिकारी स्तरावर आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्रांसंदर्भात विभागीय आयुक्तांसोबत विशेष आढावा बैठक होणार आहे.
PM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक
मनोज जरांगे आंदोलनावर ठाम
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे. ते 30 ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात त्यांचं उपोषण सुरु आहे. आता ही आरपारची लढाई असून आपलं शेवटचं उपोषण असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जोपर्यंत सरकार आपल्या पूर्ण मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रारदुसरीकडे राज्य सरकारकडून वारंवार मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. पण जरांगे उपोषणावर ठाम आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात मागण्या मान्य न झाल्यास जरांगे मुंबईच्या दिशेला आंदोलन करण्यासाठी रवाना होण्याच्या तयारीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा