• Thu. Sep 10th, 2026

Chandrapur Coal Shortage : पावसाने धडी मारल्याने उष्णता वाढली आहे. त्यामुळे आता साहजिकच विजेची मागणी देखील वाढली आहे. पण कोळसा टंचाईने वीजसंकट गहिरे झालं आहे. वीजनिर्मिती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चंद्रपूर कोळसा टंचाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
पंकज मोहरीर, चंद्रपूर : पावसाने बऱ्यापैकी विराम घेतल्याने उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढण्याची शक्यता असतानाच महानिर्मितीच्या सात वीज केंद्रांत सरासरी नऊ दिवस पुरेल इतकाच एवढा कोळसासाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. महानिर्मितीला कोळशाचे व्यवस्थापन करीत वीजनिर्मिती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून येत्या १५ सप्टेंबरपासून विदेशी कोळशाची आयात होण्याचे स्पष्ट संकेत येत आहेत.

अधिक कोळसा रॅक्स प्राप्त

राज्यात महानिर्मितीची चंद्रपूरसह कोरडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, परळी व नाशिक येथे केंद्रे आहेत. कोळसा संकट आल्याने या केंद्रांत अतिरिक्त साठा होऊ शकलेला नाही. त्यातच काही भागांत पावसामुळे कोळशाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. सध्या महानिर्मितीच्या केंद्रात दररोज सरासरी वीसहून अधिक कोळसा रॅक्स प्राप्त होत आहेत. ही घटलेली आवक आहे. वाहतुकीने येणारा कोळसा वेळप्रसंगी ओला झाल्यास वीजनिर्मितीवेळी सयंत्रांची झीज होते. त्याचा वीजनिर्मितवर प्रचंड परिणाम होतो.

Maharashtra TimesNitin Gadkari: क्रिमिनल, अंडरवर्ल्ड भागातून मला ९२ टक्के मतदान, सुशिक्षित भागात ७५ टक्के मते; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

वीज मागणी १५ टक्क्यांनी वाढली

यंदा उन्हाळा लवकर आला आहे. त्यामुळे वीज मागणी १५ टक्क्यांनी वाढली. त्यातच मुसळधार पावसामुळे काही भागांत कोळसा खाणीतून काढता आला नाही.इंडोनेशियाने कोळसा निर्यात बंद केल्याने भारतातील आयातीवर त्याचा परिणाम झाला. आता संकट गडद होऊ नये म्हणून कोळसा आयतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आयातीतून दरमहा अपेक्षित असलेल्या कोळशाचे नेमके प्रमाण किती असेल हे तूर्त स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra TimesSangli Crime : सांगलीमध्ये पुन्हा धक्कादायक घटना! कर्जाच्या तगाद्यामुळे टोकाचं पाऊल, पती-पत्नीचा एकामागून एक मृत्यू; पाटील कुटुंबावर शोककळा

चंद्रपूर केंद्रातून ६२ टक्के वीजनिर्मिती

राज्याची २५ टक्के गरज पूर्ण करणाऱ्या येथील चंद्रपूर वीज केंद्रातून रविवारी दुपारी १ हजार ८१६ मेगावॉट वीजनिर्मिती झाली. या केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅटची आहे. केंद्राने ६२ टक्के वीजनिर्मिती केली. राज्याची विजेची मागणी रविवारी दुपारी २६ हजार ८८७ मेगावॉटपर्यंत पोहचली होती. त्यावेळी महानिर्मितीच्या सात वीज औष्णिक वीज केंद्रांतून ५ हजार १९७ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात होती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा