एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या धडक मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स घेऊन या आंदोलनात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर यावेळी रोहित पवार यांनी एका गाडीवर उभं राहून केलेल्या भाषणानेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.