• Thu. Sep 10th, 2026

Sangli Palus Couple Dead : सांगली जिल्ह्यातील पलूस येथे पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका दाम्पत्याचा विष प्राशन केल्यानं रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

सांगली पलूस पती पत्नीचा विष प्रशान केल्याने मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दाम्पत्याने विष प्राशन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं या दाम्पत्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मनीषा संजय पाटील (वय 42) आणि संजय तात्यासो पाटील (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी विष प्राशन केल्याचं तालुक्यात चर्चा आहे. मात्र, या घटनेचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे

नेमकी घटना काय?

संजय पाटील आणि मनीषा पाटील यांनी 2 सप्टेंबर बुधवारी रोजी विष प्राशन केलं होतं. सुरुवातीला त्यांना ग्रामीण रुग्णालय, पलूस आणि त्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं डॉक्टरांनी 5 सप्टेंबर शनिवारी रोजी दुपारी दोघांना डिस्चार्ज दिला होता. मात्र, काल रविवारी सकाळी घरी असताना दोघांनाही पुन्हा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी पलूस ग्रामीण रुग्णालय आणि तिथून पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Maharashtra TimesSatara News: मॅरेथॉनमध्ये धावताना पुणेकर संजय कदम कोसळले; स्पर्धेतील डॉक्टरांकडून सीपीआर, पण काही तासांनी श्वास थांबला!

एकाच रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू

सकाळी 11 वाजता रुग्णालयात आणल्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी मनीषा पाटील यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. तर संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

कदम कुटुंबावर शोककळा

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पलूस शहरात घडली होती. पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्यानं एकच खळबळ उडाली होती. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय 58) यांचा सोमवारी 31 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी मृत्यू झाला होता, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय 46) यांचा उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम यांनी माहिती दिली होती.

Maharashtra TimesNashik Accident : त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना धक्का लागला, खाली पडताच एसटीच्या खाली आली, तरुणीचा जागीच अंत; लेकीचा अपघात बघून आईला भोवळ

मुलगा आई-वडिलांपासून वेगळा

दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आयुष्य संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलगा अजय कदम हा आई-वडिलांपासून वेगळा कागल येथे राहतो.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा