कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील संघर्ष गुरुवारी अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला. कोल्हापूरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने शहरात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र यावर “राजेश क्षीरसागर हा विषय आमच्यासाठी गौण आहे. कोणाच्याही बापाला शक्तीपीठ महामार्ग करू देणार नाही”, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
शक्तीपीठ महामार्गावरून संघर्षाची ठिणगी
या वादाची मूळ ठिणगी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातून पडली आहे. राजू शेट्टी यांनी या प्रकल्पासाठी जमीन मोजणीस येणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘चोप देऊ’ असा आक्रमक इशारा दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शेट्टी यांना ‘राक्षस’ संबोधून ‘सरकारने मनात आणले तर तुम्हाला उलटे टांगले जाईल’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. या विधानानंतर शेट्टी यांनी ‘टक्केवारी घेणाऱ्यांनी दम असेल तर टांगून दाखवाच’ असे प्रतिआव्हान दिले, ज्यामुळे हा राजकीय लढा वैयक्तिक संघर्षात रूपांतरित झाला आहे.
Pune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी
दुग्धाभिषेक आणि चपलांचा प्रसाद
बुधवारी आमदार राजेश क्षीरसागर समर्थकांनी राजू शेट्टींच्या प्रतिमेला ‘जोडा मारो’ आंदोलन केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकवटले. कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांचे समर्थन केले, तर दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पोस्टरला देखील ‘जोडा मारो’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी महानगरपालिका चौकाकडून छत्रपती शिवाजी चौकाकडे धाव घेतली.
FDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल
वाहनावर हल्ला आणि पोलिसांची कारवाई
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी चौकातून जाण्यास सांगितले. मात्र, आंदोलन संपवून घरी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर क्षीरसागर समर्थकांनी अचानक हल्ला केला. यावेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला पांगवले आणि दोन्ही बाजूंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
“आम्ही लेचेपेचे नाही”, राजू शेट्टींचा एल्गार
या राड्याच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘‘हल्ला कोणीही केला तरी तो पचवण्याचा शेतकऱ्यांमध्ये दम आहे; आम्ही लेचेपेचे नाही,’’ असा इशारा त्यांनी दिला. राजेश क्षीरसागर हा विषय आमच्यासाठी गौण आहे, असे सांगत महामार्गाच्या मोजणीसाठी कोणी आले तर त्याला शेतकऱ्यांचा हिसका दाखवणारच, असा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला आहे.
Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?दरम्यान, सध्या कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता असून, संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संघर्षामुळे आगामी काळात कोल्हापूरचे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा