मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या रविवारी ठाण्यात येणार आहेत. ठाण्यात रविवारी मनसेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या घडामोडी पाहता राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा येत्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी ठाण्यात होणार आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे नेमका काय ‘कानमंत्र’ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी एका महाविद्यालयात प्राचार्यांच्या कॅबिनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला असलेल्या पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला होता. या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या राड्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाला महत्त्व राहणार आहे.
राज्यभरात मनसेची सध्या पक्षबांधणी सुरु आहे. गेल्या महिन्यातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला होता. त्यानंतर येत्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा होत आहे.
Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?सकाळी दहा वाजता होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून पदाधिकारी हजर राहणार असल्याचे मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र आणि राज्य पातळीवरील मुद्द्यावर राज ठाकरे काय भाष्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Pune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी
दरम्यान, ठाणे शहरात मुंबईच्या वेशीवर कोपरी व तीन हात नाका उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनेचे (उबाठा) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘एक्स’वर या खड्ड्यांचे फोटो पोस्ट करत ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कोपरी आणि तीन हात नाका उड्डाणपुलावर खड्डे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती जणू काही वाहतूक कोंडी व्हावी, या उद्देशाने केल्यासारखी वाटते, अशी टीका ठाकरे यांनी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता व खोल खड्डे, नगरविकास मंत्र्यांनी त्यांच्या चुकीच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिले असते, तर ठाणेकरांना या त्रासाला सामोरे जावे लागले नसते, अशी थेट टीका ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमधून केली आहे. स्वतःच्या राजकारणासाठी अनावश्यक प्रकल्पांच्या नावाखाली ठाण्यात केवळ सिमेंट काँक्रीट ओतले जात आहे, ज्याचा फटका सामान्य ठाणेकरांना सहन करावा लागत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा