• Sat. Jul 25th, 2026

    पुणेकरांसाठी तिसरी मेट्रो सज्ज! पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्यास मंजुरी; उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

    पुणेकरांसाठी तिसरी मेट्रो सज्ज! पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्यास मंजुरी; उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

    Hinjewadi-Shivajinagar Metro:पुण्यात हिजंवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडलं होतं. आता केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पिंपरी: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते आर. के लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तां’ची (सीएमआरएस) मान्यता मिळाली असून, आता उद्घाटनाची वेळ निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत मेट्रो कार्यान्वित होणार, की त्याचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होणार, याची प्रतीक्षा आयटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांना आहे.

    वाहतूक सुरू करण्यास मान्यता

    हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याचे पत्र गुरुवारी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ला (पीएमआरडीए) पाठविले.

    Maharashtra TimesMumbai-Pune Highway: २०३०पर्यंत मुंबई-पुणे सुस्साट प्रवास! जुना महामार्ग, द्रुतगती मार्गांचा विस्तार होणार; काय आहे प्लॅन?

    ‘सीएमआरएस’ने जुलैच्या पहिल्या आठवड्यात या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाची आणि मेट्रो स्थानकांची पाहणी केली होती. प्राथमिक तपासणी आणि त्यानंतरच्या आढाव्यादरम्यान सुरक्षा आयुक्तांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवरील पूर्तता अहवाल पुणे आयटी सिटी मेट्रो कंपनीने सादर केला. मेट्रोच्या मार्गांवरील चाचण्यांसह मुख्य विद्युत निरीक्षकांचे ना-हरकत प्रमाणपत्र, दूरसंचार विभागाचा परवाना, सर्व १२ स्थानकांसाठी अग्निशमन विभागाची ना-हरकत प्रमाणपत्रे; तसेच स्थापत्य, ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉक प्रणालींसंदर्भातील सर्व प्रमाणपत्रे याचीही काटेकोर पडताळणी करण्यात आल्यानंतर ‘सीएमआरएस’ने प्रवासी सेवेसाठी मान्यता दिली आहे.

    “हिंजवडी ते शिवाजीनगर या ‘पुणे मेट्रो मार्गिका-३’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेली सुरक्षा आयुक्तांची मंजुरी ही पुणेकरांसाठी आणि ‘पीएमआरडीए’ साठी अत्यंत समाधानकारक बाब आहे. मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून, त्यांच्याकडून तारीख-वेळ निश्चित होताच, मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल,” डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

    “पुणे मेट्रो मार्गिका-३ला मिळालेली ही वैधानिक सुरक्षा मंजुरी प्रकल्पाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुणेकरांच्या सेवेत आधुनिक मेट्रो दाखल करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आम्ही आणखी एक निर्णायक पाऊल पुढे टाकले आहे,” अनिलकुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड

    ऑनलाइन तिकीट बुकिंग शक्य

    पहिल्या टप्प्यातील सर्व १२ स्थानकांवर स्वयंचलित भाडे संकलन प्रणाली (AFC)आधीच स्थापित करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर पाच AFC गेट्स असतील. त्यापैकी दोन प्रवेशासाठी, दोन बाहेर पडण्यासाठी आणि एक गेट दिव्यांग व्यक्तींसाठी असेल. दरम्यान, पुणे मेट्रो ३चं तिकीट ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे बुक करता येणार आहे. यासह नॅश्नल कॉमन मोबिलीटी कार्ड (NCMC) आणि व्हाटसअॅपद्वारे सुद्धा तिकीट बुक करणं शक्य होणार आहे.

    Maharashtra TimesPune Shivajinagar Flyover: पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोंडी फुटणार, शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी ७३.५२ कोटी; १.५ वर्षांत मार्ग पूर्ण

    कोणत्या १२ स्थानकांचा समावेश?

    मेगापोलिस सर्कल (माण), क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक (हिंजवडी), कोर्टयार्ड बाय मॅरियट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर(NICMAR), आणि रामनगर या स्थानकांचा समावेश असेल. हिंजवडी ते शिवाजीनगर संपूर्ण मार्ग २३.३ किमी लांब आहे आणि यावरती एकूण २३ स्थानकं आहेत. पहिल्या टप्प्यात हिंजवडी आयटी पार्क (माण) ते बाणेर/रामनगर दरम्यान स्थानकांचं उद्घाटन होणार आहे. उर्वरित ११ स्थानकांचं काम येत्या काही महिन्यात पूर्ण करून दुसरा टप्पा ही सुरू करण्यात येणार आहे.

    मेट्रो ३ नंतर पुण्यात इतर अनेक मार्गांवर मेट्रो मार्ग उभारले जात आहेत. मेट्रो मार्गिका १ आणि २ चा सध्या विस्तार सुरू आहे. भविष्यात पुण्यातील कोणत्या ठिकाणांवर मेट्रो कनेक्टिव्हिटी तयार करण्यची गरज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा