• Sat. Jul 25th, 2026
    छत्रपतींचे वंशज कमिटमेंट विसरले का? साताऱ्यातील विद्यार्थी आंदोलनांची दखलही नाही, उदयनराजेंविरोधात संताप तीव्र

    Satara Student Protest : ​’एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत कॉलर उडविणाऱ्या खासदार उदयनराजेंनी नीट पेपरफुटीवर चकार शब्द काढलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : नीट पेपरफुटीवरून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद जिल्हा आणि तालुका स्तरावर उमटत आहेत. विद्यार्थी आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा मिळत असताना भाजप नेते मात्र आंदोलनाकडे फिरकलेले नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक फॅन फालोईंग असलेले आणि अन्यायाबद्दल रोखठोक भूमिका घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांच्या बोटचेप्या भूमिकेबद्दल विद्यार्थी तीव्र भावना व्यक्त करत आहेत. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा छत्रपतींच्या वंशजाकडून साधा निषेध व्यक्त केला जात नसल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत.

    उदयनराजेंचे पेपरफुटीवर मौन

    ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत कॉलर उडविणाऱ्या खासदार उदयनराजेंनी नीट पेपरफुटीवर चकार शब्द काढलेला नाही. सातारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाची उदयनराजेंनी दखल घेतलेली नाही. त्याचबरोबर भाजपचा एकही नेता अथवा पदाधिकारी आंदोलकांच्या भेटीला गेलेला नाही. याची गंभीर नोंद आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
    Maharashtra TimesChandrakant Patil : आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका

    विद्यार्थी आंदोलनाची दखल नाही

    सातारा जिल्ह्यात कराड अपर व जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांनी सर्वात पहिल्यांदा आंदोलन छेडत नीट पेपरफुटीच्या प्रश्नावर आवाज उठवला. एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेऊन जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मोदी सरकारचा निषेध करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    ‘मारो सर’ म्हणत CJP आंदोलनात व्हायरल झालेल्या मराठी तरुणाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

    त्यानंतर कराड तहसीलदार कचेरीसमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दिला. सातारा जिल्हा काँग्रेसनेही आक्रमक आंदोलन करत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली.
    Maharashtra TimesNarendra Modi : राजीनाम्याने जबाबदारी झटकणं सोपं, पुढील कारवाईची योजना आखतोय, मोदींचं स्पष्ट मत; 12 वर्षात फक्त एकच मंत्री हटवला

    विद्यार्थ्यांकडून सवाल उपस्थित

    जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा छत्रपतींच्या वंशजाकडून साधा निषेध व्यक्त केला जात नसल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत. निवडणुकीच्या प्रचारावेळी कॉलेजमध्ये जाऊन मतदार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहण्याची ग्वाही देणारे नेते आता कुठे आहेत, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारमधील मंत्री, खासदार आमदार विद्यार्थ्यांच्या रडारवर आले आहेत.