Ajit Pawar’s Birth Anniversary: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
जनसेवा सप्ताहाचे आयोजन
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ मध्ये बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. बुधवार २२ जुलै रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त पक्षाने जनसेवा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहात प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, आणि शाळा महाविद्यालये यामध्ये ‘हरित महाराष्ट्र, वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली,’ ‘दादांची दृष्टी, हरित सृष्टी,’ अशा संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण मोहीम घेतली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद आजी-माजी सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात प्रत्येकी एक देवगिरी ते देवराई उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, राज्यव्यापी रक्तदान शिबिरे, ग्रामीण व शहरी भागात मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिरे आयोजित करण्यात आले आहे.
छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण जीवनप्रवास उलघडणार
‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडण्यात आला आहे.त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पहायला मिळते.या छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून त्यांच्या स्मृती कायम राहतील’ अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या ६७व्या जयंतीच औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात ‘अजित स्मृती, अवीट स्मृती’या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे मंगळवारी मुख्यमंत्र्य़ांच्या हस्ते उद्घाटन झाले .या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
Delhi Protest: मंत्र्यांच्या मुलांना अशी मारहाण केली असती का? दिल्लीतील आंदोलनात सहभागी भारत बानाईतच्या आई-वडिलांचा संताप अनावर
अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार
अजित दादांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहात आरोग्य क्षेत्रात मोठे काम करण्यात येण्यात असून आरोग्य शिबिरांमधून महिलांसाठी स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी,सर्वांसाठी मुख कर्करोग तपासणी व समुपदेशन तर जेष्ठ् नागरिकांसाठी देखील शिबिरे घेतली जाणार आहेत.या जनसेवा सप्ताहातून शेतकऱ्यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.यामध्ये शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजेच (एआय)आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, कृषी प्रदर्शने आयोजित करून प्रगतशील शेतकऱ्यांना ‘ अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार’दिला जाणार आहे.
Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस; आदित्य ठाकरेंचा CM फडणवीसांवर पलटवार, मारहाण केलेल्या आंदोलकांना आवाहन
सयाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली देवराई फाउंडेशन राबणार उपक्रम
या जनसेवा सप्ताहात वृक्ष संवर्धनासाठी हरित महाराष्ट्र , वृक्ष माझी सावली ,दादांची दृष्टी हरित सृष्टी या संकल्पनेला घेऊन वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे.विशेष म्हणजे सह्याद्री देवराई फाऊंडेशन च्या सहकार्याने आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवगिरी ते देवराई हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार आहे
