Chhagan Bhujbal On Jantar Mantar Protest: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, अशी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आणखी काय म्हणाले?
नाशिकमध्ये बुधवारी (दि. २२) ते पत्रकारांशी बोलत होते. ‘आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना टाळता आल्या असत्या, तर अधिक चांगले झाले असते,’ असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Nashik News: चिखलमय महामार्गावर ‘आपटी’! शंभरावर दुचाकी घसरुन अनेकजण जायबंदी, थेट रुग्णवाहिका तैनात करण्याची वेळ
‘सुनेत्रा पवारांना ताकद देणे गरजेचे’
‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपात आपण अजितदादांना पाहू या. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करीत आहेत. पक्षाने सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताकद देणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली
अजितदादांच्या आठवणीने भावुक
स्व. अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना मंत्री भुजबळ भावुक झाले. ‘मागच्या वर्षी वाढदिवस साजरा केला, पण यावर्षी जयंती होत असून, ही अतिशय दुःखद बाब आहे. अजित पवार यांनी सहकार, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासह सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले. सकाळी ६ वाजताच कामासाठी बाहेर पडणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधीची तरतूद करण्यातही अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची होती,’ असे भुजबळ म्हणाले.
Nashik News: रिक्षा प्रवासास मोजावे लागणार जादा पैसे, नाशिकमध्ये ‘आरटीओ’द्वारे सुधारित भाडेदर लागू; किती असतील दर?
यशला न्याय मिळवून देण्यासाठी आज आंदोलन
सिन्नर : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या धक्क्याने सिन्नर तालुक्यातील होतकरू विद्यार्थी यश गोसावी याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. यशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज (दि. २३) सकाळी १० वाजता सिन्नरच्या आडवा फाटा येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून हे आंदोलन होणार आहे.
